6,6,6 दिल्लीच्या ॲलिस कॅप्सीचा वुमन्स प्रीमियर लीगमध्ये धुमधडका, पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धुतलं
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत मुंबईने दिल्लीला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. दिल्लीच्या ॲलिस कॅप्सीने अपेक्षित कामगिरी केली आणि मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात दिल्ली आणि मुंबई संघ आमनेसामने आले होते. तेव्हा मुंबईने दिल्लीला मात पहिल्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना होत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकाची कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि दिल्लीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दिल्लीची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या तीन षटकात तर धावा घेण्यासाठी चांगलीच हतबलता दिसून आली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शफाली वर्मा बाद झाली. 8 चेंडूत अवघ्या 1 धाव करण्यात यश आलं. शबनिम इस्माईलने तिचा त्रिफळा उडवला. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग आणि ॲलिस कॅप्सीने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 64 धावांची भागीदारी केली. मेग लॅनिंग 25 चेंडूत 31 धावा करून बाद झाली. या खेळीत तिने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. पण खऱ्या अर्थाने दिल्लीला मोठा धावसंख्या उभारून दिली ती ॲलिस कॅप्सीने. तिने आपल्या आक्रमक फलंदाजीने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
ॲलिस कॅप्सी एकिकडे गोलंदाजांना धू धू धूत होती. तेव्हा शबनिम इस्माईलच्या गोलंदाजीवर ॲलिस कॅप्सीचा झेल सुटला. त्यामुळे मुंबई इंडियन्स गोलंदाज पुरते हतबल दिसले. ॲलिस कॅप्सीने 53 चेंडूचा सामना केला आणि 75 धावांची खेळी केली. या खेळीत तीने उत्तुंग षटकार आणि 9 चौकार ठोकले. शेवटच्या आणखी वेगाने धावा घेताना अमेलिया केरच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. रिव्ह्यूतही ती बाद असल्याचं स्पष्ट झाल्याने तंबूचा रस्ता पकडला. वुमन्स प्रीमीयर लीगच्या दुसऱ्या पर्वातील पहिलं अर्धशतक ॲलिस कॅप्सीच्या नावावर राहिल.
Double delight for @DelhiCapitals and the buzzing crowd here in Bengaluru! 💥💥
Match Centre 💻 https://t.co/GYk8lnVpA8#MIvDC pic.twitter.com/HHqBjiwuDi
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 23, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.