WPL 2024, MI vs GG : गुजरात जायंट्सने कौल जिंकत घेतली फलंदाजी, अशी असेल प्लेइंग 11
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मुंबईने हा सामना जिंकला तर टॉप 3 मधील स्थान निश्चित होईल. तर गुजरातने गमवला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होत आहे. नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून गुणतालिकेत टॉपला राहण्याची मुंबई इंडियन्सची धडपड असेल. तर गुजरात जायंट्सला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. गुजरातने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी म्हणाली की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. दिल्लीत या धावांचा पाठलाग करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही शेवटच्या सामन्यात वापरलेल्या रणनितीला चिकटून राहू इच्छितो. मुली योग्य क्षणी उभ्या राहिल्या आणि आम्हाला विजय मिळाल्याचा आनंद झाला. आम्हाला थोडं स्वातंत्र्य घेऊन खेळायला आवडेल. आमच्या संघात दोन बदल आहेत.’
नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आम्हीही प्रथम फलंदाजी निवडली असती असं मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं. “आम्ही देखील प्रथम फलंदाजी केली असती. आता आम्हाला चांगली गोलंदाजी करणं भाग आहे आणि आशा आहे की आम्ही त्यांना कमी धावांवर रोखू. आमच्यासाठी हा महत्त्वाचा खेळ आहे. आम्हाला चांगली कामगिरी करून त्यांच्यावर दबाव आणायचा आहे. आमच्या संघात कोणतेही बदल नाहीत.”, असं हरमनप्रीत कौर हीने सांगितलं.
उभय संघांमधील स्पर्धेतील ही दुसरी लढत असेल. यापूर्वी बंगळुरुत झालेल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा 5 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना केवळ 126 धावा केल्या होत्या. मुंबईने हे आव्हान 18.1 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. मुंबई इंडियन्सने सहा सामन्यापैकी चार सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरातने फक्त एक विजय मिळाला आहे. गुजरातला आजचा हा सामना जिंकता आला नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर/कर्णधार), फोबी लिचफिल्ड, ॲशलेग गार्डनर, दयालन हेमलता, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम शकील.