WPL 2024, MI vs GG : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातला पाच विकेट्सने लोळवलं

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर गुजरात जायंट्सला पराभूत केलं आहे. गुजरातने दिलेलं आव्हान ११ चेंडू राखून पूर्ण केलं. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.

WPL 2024, MI vs GG : मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय, गुजरातला पाच विकेट्सने लोळवलं
WPL 2024, MI vs GG : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरु, दिल्लीनंतर आता गुजरातला पाजलं पराभवाचं पाणी
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 10:55 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पराभूत केलं होतं. आता गुजरात जायंट्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच गुजरात जायंट्स मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. गुजरातचा संघ २० षटकात ९ गडी गमवून १२६ धावा करू शकला. तर मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १२७ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान मुंबई इंडियन्सने ५ गडी गमवून १८.१ षटकात पूर्ण केलं. स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकत मुंबईने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आता पुढच्या दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांचा सामना करायचा आहे.

मुंबई इंडियन्सचा डाव

मुंबईकडून हरमनप्रीत कौर हीने कॅप्टन इनिंग खेळली. सुरुवातील दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर नॅट सायव्ह ब्रंट आणि अमेलिया केरसोबत चांगली भागीदारी केली. तसेच शेवटपर्यंत नाबाद ४६ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यास्तिका भाटिया ७, हेली मॅथ्यूज २, नॅट स्कायव्हर ब्रंटच २२, अमेलिया केर ३१ आणि पूजा वस्त्राकार १ धाव करून बाद झाली. गुजरातकडून तनुजा कन्वारने २, ली ताहूहू १ आणि कार्थिन ब्रायसने एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.