WPL 2024, MI vs GG : मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा टॉसची साथ, गोलंदाजी निवडत हरमनप्रीत कौर म्हणाली…

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. स्पर्धेतील मुंबईचा हा दुसरा आणि गुजरातचा पहिलाच सामना आहे. त्यामुळे गुणतालिकेत टॉपवर राहण्याचा मुंबईचा मानस असेल. तर गुजरात जायंट्स स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहे.

WPL 2024, MI vs GG : मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा टॉसची साथ, गोलंदाजी निवडत हरमनप्रीत कौर म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 7:12 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सन आणि गुजरात जायंट्स आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल मिळाला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने क्षणाचाही विचार न करता पहिल्या सामन्यासारखंच गोलंदाजीला प्राधान्य दिलं. कारण दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. तसेच गोलंदाजी करणं कठीण होतं. “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. येथे दव हा घटक महत्त्वाचा आहे त्यामुळेच आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. शेवटच्या सामन्यात आम्ही खूप धावा दिल्या आणि आज आम्हाला अधिक शिस्तबद्ध राहावे लागेल. आम्ही त्याच टीमसोबत पुन्हा उतरणार आहोत.”, असं मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं. तर बेथ मूनी हीनेही नाणेफेकीनंतर आपलं मत व्यक्त केलं आहे.

“हा थोडा 50-50 कॉल होता, ही एक नवीन विकेट आहे आणि आम्ही प्रथम फलंदाजी करण्यास हरकत नाही. तयारी चांगली झाली आहे, आम्हाला काही संधी मिळतील आणि आशा आहे की, त्यात आम्ही सर्वोत्तम असं करू. फोबी लिचफिल्ड, ली ताहुहू आणि कॅथरीन ब्राइस या परदेशी खेळाडू पदार्पणाच्या सामन्यात खेळतील. दुर्दैवाने, लॉरा वोल्वार्ड सामन्यात नसेल. आमच्याकडे वेद कृष्णमूर्ती आणि मेघना सिंगही आहे. त्यामुळे ही एक उत्तम लाइन-अप असेल.”, असं गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी हीने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा, तनुजा कंवर, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, मेघना सिंग.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.

दोन्ही संघातील खेळाडू

गुजरात जायंट्स महिला संघ: बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, फोबी लिचफिल्ड, ॲशलेग गार्डनर, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलथा, स्नेह राणा, तनुजा कंवर, मेघना सिंग, सायली सथगरे, ली ताहू, मन्नत कश्यप, मन्नत कश्यप शकील, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिता, तरन्नुम पठाण, कॅथरीन ब्राइस

मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक, क्लोई ट्रायन जाफर, इस्सी वोंग, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, प्रियांका बाला, अमनदीप कौर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.