WPL 2023, MI vs RCB : मुंबई इंडियन्सला पराभूत करत बंगळुरुची टॉप 3 मध्ये एन्ट्री

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तसेच मुंबई इंडियन्सला 113 धावांवर रोखलं. यामुळे विजय सोपा झाला आणि टॉप 3 मध्ये एन्ट्री मारली.

WPL 2023, MI vs RCB : मुंबई इंडियन्सला पराभूत करत बंगळुरुची टॉप 3 मध्ये एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 10:28 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील टॉप 3 चे संघ ठरले आहेत. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एन्ट्री मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा रनरेट पाहता गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहील असंच चित्र आहे. त्यामुळे बाद फेरीतील एकमेव सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळु हे संघ आमनेसामने येतील यात शंका नाही. दरम्यान नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधानाने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्लीत चालत आलेल्या ट्रेंडच्या अगदी विरुद्ध निर्णय घेत गोलंदाजी स्वीकारली. स्मृतीचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी लावला. खासकरून एलिसा पेरीने मुंबई इंडियन्सची पिसं काढली. मुंबई इंडियन्सचा संपूर्ण 19 षटकात आटोपला. मुंबईला सर्वबाद 113 धावा करता आल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे आव्हान 16 व्या षटकात पूर्ण केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून एलिसा पेरीने अक्षरश: धुमाकूळ घातला. डिव्हानने पहिला ब्रेक मिळवून दिला. हिली मॅथ्यूला 26 धावांवर असताना तंबूत पाठवलं. त्यानंतर एलिसा पेरीच्या गोलंदाजीवर विकेटचा सपाटा सुरु झाला. एस सजना 30, नॅट सायव्हर 10, हरमनप्रीत कौर 0, अमेलिया केर 2, अमनजोत कौर 4, पूजा वस्त्राकार 6 अशा विकेट्स घेतल्या. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील हा सर्वात बेस्ट स्पेल होता. एलिसा पेरीने 4 षटकात 15 धावा देत 6 गडी बाद केले. तर मोलिनेक्स, डिव्हाईन, आशा सोभना आणि श्रेयंका पाटील यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.