WPL 2024, MI vs UPW : मुंबई इंडियन्सचं युपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सहावा सामना युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 161 धावा केल्या.

WPL 2024, MI vs UPW : मुंबई इंडियन्सचं युपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 9:05 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं आहे. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबईला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मागच्या सामन्यातील अंदाज घेऊन युपी वॉरियर्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला युपीसमोर मोठं आव्हान ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. हिली मॅथ्यूज आणि यास्तिका भाटिया यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. यास्तिका भाटिया बाद झाल्यानंतर नॅट सायव्हर ब्रंट मैदानात आली. पण दु्र्दैवाना 19 धावांवर असताना धावचीत झाली. त्यानंतर हिलीला अमेलिया केरची साथ मिळाली. पण भागीदारी जास्त काळ टिकू शकली नाही. हिली 55 धावा करून तंबूत परतली. अमेलिया केर 23 धावा करून दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. पूजा वस्त्राकारही काही खास करू शकली नाही 18 धावांवर तंबूत परतली.

युपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिस, अंजली सर्वानी, सोफी एक्सलस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आता मुंबई इंडियन्सनच्या गोलंदाजांसमोर विजयासाठी दिलेलं आव्हान रोखण्याचं आव्हान आहे. आता मुंबई इंडियन्सचे गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, इस्सी वाँग, एस सजना, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.