मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वात बंगळुरुने पहिला सामना जिंकला आहेत. तर गुजरात जायंट्सला आपल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या सामन्या कोण बाजी मारतं याकडे लक्ष लागून आहे. नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयामागचं तथ्य सांगितलं. स्मृती मंधाना म्हमाली की, “आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये काहीतरी करणं गरजे आहे. शेवटचा गेम शानदार होता, जवळचे विजय नेहमीच खास असतात. आम्हाला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करायचीआ आहे. पहिला गेम नक्कीच महत्त्वाचा होता पण भूतकाळ विसरून पुढे जाणेही महत्त्वाचे आहे. आम्ही त्या संघासोबत मैदानात उतरणार आहोत.”
प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी व्यक्त झाली आहे. ” आमच्या इथे-तिथे काही बैठका झाल्या आहेत. या स्पर्धा खूप लवकर होत आहेत. आम्हाला निकाल येण्यापूर्वीच पद्धतीवर विश्वास ठेवायला हवा आणि प्रक्रिया करायला हवी. आमच्याकडे काही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, त्यापैकी काहींना मुकावे लागेल पण संधी मिळतील. काहीही बदल नाही.”
🚨 Toss Update 🚨@RCBTweets win the toss and elect to field against @Giant_Cricket.
Match Centre 💻📱 https://t.co/wV0BEgckTA#TATAWPL | #RCBvGG pic.twitter.com/mSRxb95UnV
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 27, 2024
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार/विकेटकीपर), वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, ली ताहुहू, मेघना सिंग.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफी डेव्हाईन, स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग