WPL 2024, RCB Vs UPW : नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत कर्णधार एलिसा हिली म्हणाली…

वुमन्स प्रीमियर लीगचा दुसरा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. मागच्या पर्वात बंगळुरुची कामगिरी सुमार राहिली होती. पण या पर्वात बंगळुरुचा संघ जोमाने उतरला आहे. पण नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारली.

WPL 2024, RCB Vs UPW : नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत कर्णधार एलिसा हिली म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 7:15 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे. नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सने जिंकला आणि तात्काळ गोलंदाजीचा निर्णय घेतला. युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली हिने पहिल्या सामन्यातील रिझल्ट पाहिला आहे. तसेच दव फॅक्टरही दुसरा डावात महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मुंबईसारखंच युपीनेही धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. अशा मैदानावर खेळणे एक आव्हान असेल. आम्हाला गोलंदाजीत काम करावे लागेल. पूनम या सामन्यात मोठी भूमिका साकारू शकते. तसेच चामरी अथपथूकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत.”, असं एलिसा हिली हीने सांगितलं.

स्मृती मंधानाने नाणेफेकीचा कौल गमवला आणि पहिली बॅटिंग करावी लागणार आहे. स्मृतीने आपलं मत मांडताना सांगितलं की, “नाणेफेक जिंकल्यानंतर ते गोलंदाजी घेणार आम्हाला आधीच माहीत होते.आम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. आरसीबीचा चाहतावर्ग असाच आहे. मला वाटते काल रात्री सारखीच विकेट आहे. जर आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळलो तर 175 ही चांगली धावसंख्या असेल. गेल्या वर्षी आम्ही चांगलं खेळलो नाहीत. स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंनी स्टेपअप करणे महत्त्वाचे आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅक्ग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकोर.

दोन्ही संघाचे खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, सभिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, शोभना आशा, सिमरन बहादूर, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, रेणुका ठाकूर सिंग, दिशा कासट, नादीन डी क्लर्क, एकता बिष्ट, सोफी मोलिनक्स, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, श्रद्धा पोखरकर.

यूपी वॉरियर्स स्क्वॉड: ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्शवी चोप्रा, गौहर सुलताना, चौमाउर सुलताना, चौपडा , लक्ष्मी यादव , डॅनियल व्याट , सोप्पधंडी यशश्री , पूनम खेमनार.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.