WPL 2024, RCBW vs UPW : आरसीबीचा स्पर्धेत श्रीगणेशा, युपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या होत्या. पण युपी वॉरियर्स 155 धावा करता आल्या.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील दुसरा सामनाही अतितटीचा झाला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच सामन्यात रंगत आली होती. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती. पण दीप्ती शर्मा काही चमत्कार करता आला नाही. शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेता आल्या. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने युपी वॉरियर्सवर 2 धावांनी विजय मिळवला. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रात्रीचं दव फॅक्टर समोर ठेवूनच हा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय काही पथ्यावर पडला नाही. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. युपी वॉरियर्सला 20 षटकात 7 गडी गमवून 155 धावा करता आल्या. शेवटच्या पाच षटकात झटपट विकेट गमवल्याने युपीचा विजय लांबला आणि तीच संधी बंगळुरुने साधली. युपीकडून कोणलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर बंगळुरुकडून शोभना आशाने 4 षटकात 22 धावा देत 5 गडी बाद केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची डावाची सुरुवात अडखळत झाली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सोफी डिव्हाईन पायचीत होत तंबूत परतली. तिला फक्त एक धाव करण्यात यश आलं. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना काही खास करू शकली नाही आणि 13 धावा करून बाद झाली. तसचे एलिसा पेरीही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. तिला फक्त 8 धावा करता आल्या. संघाची स्थिती नाजूक असताना सब्बीनेनी मेघना आणि रिचा घोष यांची डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मेघनाने 44 चेंडूत 53 धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली वारेहमला खातंही खोलता आलं नाही. दुसरीकडे रिचा घोषने बाजू धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने 37 चेंडूत 62 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, सिमरन बहादूर, शोभना आशा, रेणुका ठाकूर सिंग.
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅक्ग्रा, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, किरण नवगिरे, वृंदा दिनेश, पूनम खेमनार, श्वेता सेहरावत, ग्रेस हॅरिस, सायमा ठाकोर.