WPL 2024 : सोलापूरच्या किरण नवगिरेनं मुंबईविरुद्ध वादळी खेळीमागचं खरं कारण सांगितलं, अशी ठरली होती रणनिती

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सोलापूरच्या किरण नवगिरेची आक्रमक खेळीची प्रचिती आली. आक्रमकपणे खेळत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. पण पहिल्या दोन सामन्यात सहाव्या स्थानावर खेळलेल्या किरणला ओपनिंगला संधी कशी मिळाली? यावरचा पडदा स्वत:च दूर केला आहे.

WPL 2024 : सोलापूरच्या किरण नवगिरेनं मुंबईविरुद्ध वादळी खेळीमागचं खरं कारण सांगितलं, अशी ठरली होती रणनिती
WPL 2024 : सोलापूरच्या किरण नवगिरेच्या आक्रमक खेळीमागचं रहस्य काय? स्वत:च सांगितलं सर्वकाही
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 3:10 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्सचं पारडं जड होतं. युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. मुंबईने अपेक्षेप्रमाणे 6 गडी गमवून 161 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे युपी वॉरियर्सला विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. एलिसा हिलीसोबत ओपनिंगला लेडी धोनी नावाने ओळखली जाणारी किरण नवगिरे उतरली. पहिल्या षटकात ती पुढे काय करेल याचा कुणालाच अंदाज नव्हता. मात्र दुसऱ्या षटकात स्ट्राईक मिळताच आक्रमक सुरुवात केली. बघता बघता चेंडू आणि धावांमधील अंतर कमी केलं. किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 48 धावा तिने चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या. तिने 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. किरण नवगिरेला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. सामन्यानंतर तिने आपलं मन मोकळं केलं.

“मागच्या सामन्यात जास्त दुखापत झाली नाही, मी आता ठीक आहे. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की कदाचित तुला ओपनिंग करावं लागेल. म्हणून मी मानसिक तयारी केली होती. जेव्हा स्कोर मोठा होता तेव्हा मुख्य प्रशिक्षक मला म्हणाले की तू सलामीला उतरशील. त्यामुळे मला आनंद झाला. मी गुणवत्तेवर चेंडू खेळत होते आणि हीच योजना होती. मला माझ्या ताकदीनुसार खेळायला आवडते आणि मी तेच करते.”, असं किरण नवगिरे हीने सामन्यानंतर सांगितलं.

वुमन्स लीगच्या पहिल्या दोन सामन्यात किरण नवगिरेल सहाव्या स्थानावर उतरली होती. यावेळी तिला काही खास कामगिरी करता आली नाही. किरणने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अवघी 1 धाव केली होती. तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सहाव्या क्रमांकावर उतरून 7 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. युपी वॉरियर्सचा स्पर्धेतील चौथा सामना गुजरात जायंट्ससोबत 1 मार्च रोजी आहे.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.