WPL 2024 : नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने, गोलंदाजी घेत हरमनप्रीत कौर म्हणाली…
वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि हरमनप्रीत कौर हीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यातील नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कौल जिंकताच हरमनप्रीत कौरने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आम्ही आधी गोलंदाजी करू. दव मुख्य घटक ठरणार आहे. त्यामुळेच आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. आमच्या संघात तीन खेळाडू पदार्पण करणार आहेत. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. मी खेळाडूंना एकच सांगू शकते की, आम्हाला गोष्टी सोप्या ठेवायच्या आहेत आणि प्लानिंगची अंमलबजावणी करायची आहे.” तर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग हीनेही नाणेफेकीनंतर आपलं मत व्यक्त केलं. “चांगली विकेट दिसते, त्यात भरपूर धावा होतील. मुंबई चांगली बाजू आहे, आव्हानासाठी उत्सुक आहे. मी या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे. तयारी चांगली झाली आहे. स्वतंत्रपणे खेळण्याची गरज आहे. आम्ही चार सीमर्स आणि तीन फिरकीपटूंसह उतरणार आहोत. “, असं मेग लॅनिंग यांनी सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्ज, मारिझान कॅप, एनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
दोन्ही संघाचे खेळाडू
मुंबई इंडियन्स महिला संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता, अमनदीप कौर, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, हुमाइरा काझी, इस्सी वोंग, प्रियांका बाला, एस सजना, कीर्तना बालकृष्णन, फातिमा जाफर
दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, शिखा पांडे, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, तीतास साधू, मिन्नू मणी, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, अरुंधती रेड्डी, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, स्नेहा दीप्ती