WPL 2024, UPW vs DC : नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, कर्णधार मेग लॅनिंग गोलंदाजी घेत म्हणाली…

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामी देण्यासाठी इच्छुक आहेत. आात कोण बाजी मारतं? याकडे लक्ष लागून आहे.

WPL 2024, UPW vs DC : नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने, कर्णधार मेग लॅनिंग गोलंदाजी घेत म्हणाली...
WPL 2024, UPW vs DC : टॉस जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने घेतली गोलंदाजी, कर्णधार मेग लॅनिंग म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 7:10 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथा सामना युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीचा सामना गमावला आहे. दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने, तर युपी वॉरियर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभूत केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी आतुर आहेत. कारण आता पराभूत मानसिकतेने पुढे जाणं कठीण असेल. त्यामुळे या सामन्यातील विजयासाठी दोन्ही संघ धडपड करतील. दरम्यान नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला. त्यामुळे मेग लॅनिंगने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली. कारण दुसऱ्यांदा फलंदाजी करत धावांचा पाठलाग करणं सोपं दिसून आलं आहे. “आम्ही गोलंदाजी करणार आहोत. कारण दव पडू शकते. आम्ही खरोखरच एका चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत. त्या गेममध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या. आम्हाला या गेममध्ये येण्याचा विश्वास आहे. एकच संघ, कोणताही बदल नाही.”, असं कर्णधार मेग लॅनिंग म्हणाली.

दुसरीकडे, युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली हिनेही बाजू मांडली, “आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती, परंतु प्रथम फलंदाजी करण्यात आनंद होत आहे. कोणतीही स्पर्धा सोपी नाही. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत आहे हे पाहणे खूप छान आहे. आम्ही नुकतेच अधिक चांगले कसे होऊ शकतो याबद्दल बोललो. निर्णय घेताना अधिक हुशार असणे आवश्यक आहे.”, असं कर्णधार एलिसा हिली म्हणाली.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुलताना.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.