RCB vs UPW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय, युपी वॉरियर्सचा पुढचा प्रवास झाला कठीण

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 11 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने बाजी मारली. युपी वॉरियर्सला धावांनी पराभूत करत टॉप थ्रीमध्ये एन्ट्री मारली. आता आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी पुढील सामन्यात विजय महत्त्वाचे आहेत.

RCB vs UPW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय, युपी वॉरियर्सचा पुढचा प्रवास झाला कठीण
RCB vs UPW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची रणनिती आली कामी, नाणेफेक गमवूनही जिंकला युपी वॉरियर्स विरुद्धचा सामना
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 10:55 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचे असल्याचं दिसून आलं आहे. पण युपी वॉरियर्सला नाणेफेक जिंकून काहीच फरक पडला. प्रथम गोलंदाजी घेऊन बंगळुरुला कमी धावांवर रोखणं जमलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. सब्भीनेनी मेघना आणि स्मृती मंधाना यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि एलिसा पेरी यांनी निर्णायक खेळी करून धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधाने हीने 50 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 3 षटकार मारले. तर एलिसा पेरीनेही 37 चेंडूत 58 धावा केल्या यात 4 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यांच्या या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा करता आल्या. युपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. पण युपी वॉरियर्सला 175 धावा करता आल्या आणि 23 धावांनी पराभव सहन करावा लागला.

एलिसा हिली आणि किरण नवगिरेने चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी 4.2 षटकात 47 धावांची भागीदारी केली. पण किरण नवगिरे बाद झाली आणि सर्व डावच फिस्कटला. चमारी अथापट्टू 8, ग्रेस हरीस 5, श्वेता सेहरावत 1 धाव करून तंबूत परतले. एलिसा हिलीने एकाकी झुंज सुरु ठेवली होती. 55 धावांवर असताना बाद झाली आणि विजयाचं आणखी कठीण झालं. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत गेलं आणि पराभव वेशीवर येऊन ठेपले.

या विजयानंतर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर युपी वॉरियर्सची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी युपी वॉरियर्सला उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवाला लागणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी

दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.