Auction : 15 डिसेंबरला ऑक्शन, 120 पैकी फक्त 19 खेळाडूंची होणार निवड, किती वाजता सुरुवात?
Auction 2025 Live Streaming : रविवारी 15 डिसेंबरला ऑक्शन पार पडणार आहे. फक्त 120 खेळाडूंमधून फक्त 19 क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) काही दिवसांपूर्वी मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशिब फळफळलं. काही खेळाडूंवर कोटींची बोली लागली. युवा खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला. तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गज हे अनसोल्ड राहिले. त्यानंतर आता रविवारी 15 डिसेंबरला डबल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. मिनी ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार? मिनी ऑक्शन कुठे पाहता येणार? हे सर्वकाही आपण जाणून घेऊयात.
डब्ल्यूपीएलचा यंदाचा तिसरा हंगाम आहे. या तिसऱ्या हंगामासाठी मिनी ऑक्शन होत आहे. या मिनी ऑक्शनचं आयोजन हे बंगळुरुत करण्यात आलं आहे. बीसीसीआयने ऑक्शनसाठी 120 खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. अशात आता या 120 मधून 19 खेळाडूंची निवड होणार आहे. या 120 खेळाडूंमध्ये 91 भारतीय तर 29 परदेशी खेळाडू आहेत. एकूण 5 संघांना फक्त 19 खेळाडूंची गरज आहे. या 120 खेळाडूंमधून 19 जणींची निवड केली जाणार आहे. या 19 पैकी 5 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत.
मिनी ऑक्शन टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?
मिनी ऑक्शन टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
मिनी ऑक्शनला किती वाजता सुरुवात होणार?
मिनी ऑक्शनला दुपारी 3 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
सर्वात युवा आणि सर्वात वयस्कर खेळाडू
इरा जाधव आणि अंशु नागर या 13 वर्षांच्या दोघी मिनी ऑक्शनमधील सर्वात युवा खेळाडू आहेत. तर लारा हॅरीस आणि हीटरन या 34 वर्षांच्या दोघी सर्वात वयस्कर खेळाडू आहेत.
रविवारी होणार फैसला
1️⃣2️⃣0️⃣ players 🙌
Here is a breakdown of capped and uncapped players in the #TATAWPLAuction 👌 #TATAWPL pic.twitter.com/wgN0KZWSBW
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) December 12, 2024
120 पैकी किती भारतीय खेळाडू?
दरम्यान मिनी ऑक्शनसाठी 120 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहेत. या 120 पैकी 82 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आहेत. तर 22 परदेशी कॅप्ड खेळाडू आहेत. तर 9 कॅप्ड भारतीय आणि 8 अनकॅप्ड परदेशी खेळाडू आहेत.