WPL 2025 Final : दिल्ली विरुद्ध मुंबई महाअंतिम सामना, शनिवारी रंगणार थरार, जाणून घ्या
Wpl 2025 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women Final : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामातील अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले आहेत.

एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमातील अंतिम सामन्याची तयारी सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स वूमन्सने गुरुवारी 13 मार्चला गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिलीय. तर त्याआधी दिल्ली कॅपिट्ल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे आता डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता होण्यासाठी मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात थरार रंगणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सर्व सविस्तर जाणून घेऊयात.
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना केव्हा?
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना शनिवारी 15 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना कुठे?
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणार आहे.
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
दिल्ली विरुद्ध मुंबई अंतिम सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
अंतिम सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई भिडणार
𝙏𝙝𝙚𝙮 𝙈𝙚𝙚𝙩 𝘼𝙜𝙖𝙞𝙣….𝙄𝙣 𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡 😍
Delhi Capitals 🆚 Mumbai Indians
🗓 Saturday, March 15, 2025 ⏰ 8.00 PM IST 🏟 Brabourne Stadium, Mumbai#TATAWPL | #DCvMI | #Final | @DelhiCapitals | @mipaltan pic.twitter.com/e2fyj21ViB
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2025
मुंबई इंडियन्स वू्मन्स टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी, जिंतिमणी कलिता, सायका इशाक, कीर्थना बालकृष्णन, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन.
दिल्ली कॅपिट्ल्स वूमन्स टीम : मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेहा दीप्ती, ॲलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी कश्यप, सारा ब्राइस, तानिया भाटिया आणि तीतस साधू.