अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) 2 दिवसीय मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू मालामाल झाले. तर काही खेळाडू दुर्देवी ठरले. त्यानंतर आता 15 डिसेंबरला डबल्यूपीएलच्या तिसऱ्या हंगामासाठी (WPL 2025) मिनी ऑक्शन पार पडलं. मुंबईने या मिनी ऑक्शनमधून अवघ्या 16 वर्षीय युवा खेळाडूला आपल्या गोटात घेतलं. ही 16 वर्षीय युवा खेळाडू कोट्यधीश झाली. मुंबईने विकेटकीपर जी कामालिनी हीला 1 कोटी 60 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. कामालिनी हीची बेस प्राईज ही 10 लाख इतकी होती. मुंबईने या ऑक्शनमधून एकूण 4 खेळाडूंना टीममध्ये घेतलं.
मुंबई इंडियन्सने मिनी ऑक्शनआधी एकूण 14 खेळाडू रिटेन केले होते. या 14 खेळाडूंमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर, अमेलिया केर, हॅली मॅथ्यूज, नॅट सायव्हर ब्रंट आणि अन्य खेळाडूंचा समावेश होता. तर मुंबई या मिनी ऑक्शनमध्ये 2 कोटी 65 लाख रुपयांसह उतरली होती. मुंबईने कामालिनीवर या निम्म्यापेक्षा अधिक रक्कम खर्च केली.
तामिळनाडूची ऑलराउंडर जी कामालिनी हीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी ऑक्शनमध्ये चुरस पाहायला मिळाली. जी कामालिनीसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र अखेरीस मुंबईने बाजी मारली आणि जी कामालिनी मंबईची झाली. कामालिनीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. कामालिनी अंडर 19 वूमन्स टी 20 ट्रॉफी सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू ठरली. तिने 8 सामन्यात 311 धावा केल्या.
डबल्यूपीएल 2025 साठी मुंबई टीम
#AaliRe aali, aapli 2025 chi team aali! 🙌💙
🔹 Harmanpreet Kaur
🔹Amandeep Kaur
🔹Amanjot Kaur
🔹Amelia Kerr ✈️
🔹Chloe Tryon ✈️
🔹Hayley Matthews ✈️
🔹Jintimani Kalita
🔹Keerthana Balakrishnan
🔹Natalie Sciver-Brunt ✈️
🔹Pooja Vastrakar
🔹Saika Ishaque
🔹Sajana Sajeevan…— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2024
नादिन डी क्लर्क : 30 लाख
जी कामालिनी : 1 कोटी 60 लाख
संस्कृति गुप्ता : 10 लाख
अक्षिता माहेश्वरी : 20 लाख
मुंबई इंडियन्सची अपडेटेड टीम : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायन, हॅली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, नॅट सायव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, साइका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माइल, सजना सजीवन, अमनदीप कौर, कीर्तन बालाकृष्णन, जी कामालिनी, नादीन डी क्लार्क, संस्कृती गुप्ता आणि अक्षिता माहेश्वरी.