WPL Auction किती खेळाडू, केव्हा लागणार बोली? जाणून घ्या सर्वकाही
महिला आयपीएलला सुरुवात 4 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 22 मॅच होणार आहेत. तर 26 मार्च रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.
मुंबई : महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतेय. लवकरच स्पर्धेच्या पहिल्या हंगामाची प्रत्येक जण उत्सूकतेने वाट पाहत आहे. पहिल्या हंगामाला 3 आठवड्यांचा वेळ आहे. मात्र त्याआधी खेळाडूंचं ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनकडे सर्वाचं लक्ष आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर महिला आयपीएलचं ऑक्शन पार पडणार आहे. ज्याप्रमाणे आयपीएलच्या ऑक्शनची उत्सूकता असते, त्याच प्रकारे महिला आयपीएलचंही नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं जाणार आहे
बीसीसीआयने ट्विट करत महिला आयपीएलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्विट करत तारीख आणि खेळाडूंची यादी अशी सविस्तर माहिची दिली आहे. एकूण 5 टीम या महिला आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. यासाठी ऑक्शन केव्हा पार पडणार आहे, याबाबतची माहिती दिलीय.
महिला आयपीएलमध्ये एकूण 5 संघ
बीसीसीआयने 26 जानेवारीला ऑक्शनसाठी 5 फ्रँचायजींची घोषणा केली होती. गुजरात जायंट्स, मुंबई इंडियस, आरसीबी, दिल्ली कॅपिट् आणि लखनऊची यूपी वॉरियर्स अशा 5 टीम्स आहेत.
ऑक्शन केव्हा आणि कुठे?
महिला आयपीएलसाठी ऑक्शन 13 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हे ऑक्शन मुंबईतील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या ऑक्शनला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
एकूण किती खेळाडू?
या महिला आयपीएलमधील लिलावासाठी एकूण 1 हजार 525 नोंदणी केली. यामधून 409 खेळाडूंची निवड करण्यात आली. या 409 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. यामध्ये 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर 8 असोसिएट देशांमधील खेळाडू आहेत.
महिला आयपीएलसाठीच्या प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त 18 खेळाडूंना घेता येणार आहे. त्यानुसार 5 टीम एकूण 90 खेळाडू खरेदी करु शकते. यामध्ये 30 परदेशी खेळाडू असू शकतात.
महिला आयपीएलला सुरुवात 4 मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 22 मॅच होणार आहेत. तर 26 मार्च रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेतील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील बेब्रॉन आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलंय.