WTC Final 2023 आधी बीसीसीआयमधून मोठी बातमी समोर, ‘या’ खेळाडूबाबत घेणार मोठा निर्णय!
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल सामन्याआधी मोठा झटका बसला होता. मॅचविनर आणि स्टार खेळाडू श्रेअस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे फायनल सामन्यामध्ये खेळू शकणार नाही.
मुंबई : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल सामन्याआधी मोठा झटका बसला होता. मॅचविनर आणि स्टार खेळाडू श्रेअस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे फायनल सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्याजागी संघात कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. अशातच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने श्रेअस अय्यरच्या जागेवर ज्या खेळाडूची वर्णी लागू शकते त्याच्याबाबत माहिती दिली आहे. नेमका कोण आहे हा खेळाडू कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
श्रेअस अय्यर शस्त्रक्रियेसाठी परदेशात जाणार असून रिकव्हर व्हायला त्याला तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. आताच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये त्याला मालिकेतून बाहेर पडाव लागलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये तो परतला होता खरा पण त्याला फारशी काही चमक दाखवता आली नव्हती. त्याला भारत आणि बांगलादेश डिसेंबर 2022 दौऱ्यादरम्यान दुखापत झाली होती.
श्रेअस अय्यरच्या जागी खेळणारा खेळाडू हा दुसरा तिसरा कोणी नसून हनुमा विहारी असू शकतो, असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
श्रेयस आमच्यासाठी महत्त्वाचा फलंदाज होता. तो दुखापतग्रस्त झाल्याने बीसीसीआय हनुमा विहारीचा विचार करत आहे. विहारी अनुभवी फलंदाज असून त्याचा त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही चांगला आहे. मात्र अंतिम निर्णय निवड समितीच्या बैठकीत घेतला जाईल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
हनुमा विहारीने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दोनदा दौरा केला होता. भारताने दोन्ही कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन वेगवान त्रिकुटाविरुद्ध धावा कशा करायच्या हे हनुमा विहारीला चांगलेच माहीत आहे.
दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात दुखापत झाल्यानंतरही हनुमा विहारीने 161 चेंडूंत नाबाद 23 धावा करून सामना अनिर्णित ठेवला. हनुमा विहारीने 16 कसोटीत 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.त्यासोबतच त्याने पाच बळीही घेतले आहेत.