Ajinkya Rahane : आता कांगांरूचं काही खरं नाही, रहाणेबाबतीत केलेली ‘ती’ चूक शार्दुलबाबतही केली!
कांगारूंनी मोठ्या चुका केल्या यामध्ये अजिंक्य रहाणेसा कमिन्सने टाकलेला नो बॉल, त्यानंतर रहाणेने शतकाच्या दिशेने केलेली वाटचाल. कमिन्सने परत पून्हा ती चूक केली आणि भारताला आणखी एक संधी दिली.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये 2023 कांगारूंनी टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं होतं. मात्र एकवेळ संघातून डच्चू मिळालेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने संघाला तारलं आहे. कांगारूंनी 469 धावांचा डोंगर उभारला होता. बॅटींगल उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात खराब झाली होती, अवघ्या 71 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि आज तिसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर यांनी टीम इंडियाला ट्रॅकवर आणलं आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर के एस भरत लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या लॉर्ड शार्दुल ठाकूर दोघांनी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे पोहोचवलं आहे. कांगारूंनी मोठ्या चुका केल्या यामध्ये अजिंक्य रहाणेसा कमिन्सने टाकलेला नो बॉल, त्यानंतर रहाणेने शतकाच्या दिशेने केलेली वाटचाल.
अजिंक्य रहाणेनंतर शार्दुलचे कॅच सोडले गेले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमिन्सने सत्राच्य़ा शेवटच्या ओव्हरमध्ये शार्दुला आऊट केलं होतं. 60 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलरव शार्दुल पायचीत झाला होता. पचांनी त्याला आऊटही दिलं. त्यानंतर डीआरएस घेतल्यावर कमिन्सने नो बॉल टाकला होता. त्यामुळे सत्र संपताना टीम इंडियाला धक्का बसला असता. कमिन्सच्या चुकीमुळे त्याला आणखी एक जीवदान मिळलं.
आता अजिंक्य रहाणे 112 चेंडूत नाबाद 82 धावा आणि शार्दुल ठाकूर 83 चेंडूत नाबाद 36 धावांवर खेळत आहे. टीम इंडिया अजून 209 धावांनी पिछाडीवर आहे. रहाणे आणि ठाकूर यांची शतकी भागीदारी झाली आहे. कांगारू दुसऱ्या सत्रामध्ये भागीदारी फोडण्याचा प्रयत्न करतील.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.