WPL Final, DC vs RCB : दिल्लीचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 114 धावांचं आव्हान, शफाली वर्मानंतर सर्वकाही फूसsss
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचे तारेच फिरले. शफाली वर्मा आणि मेग लेनिंगने जबरदस्त सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये 64 धावांची खेळी या जोडीने केली. मात्र त्यानंतर डाव ढासळला आणि धावांची गती कमी झाली.
मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सची सर्वात वाईट स्थिती झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीचा हा निर्णय सुरुवातील योग्य वाटला, पण नंतर सर्वकाही गणित बिघडलं. दिल्ली कपिटल्सकडून शफाली वर्मा आणि मेग लेनिंगने चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने बिनबाद 64 धावा केल्या. मात्र त्यानंतर विकेट्स पडण्याची मालिका सुरु झाली. त्यामुळे धावांची गती मंदावली. दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकात 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. पहिल्या डावात सोफी मोलिनक्स चमकली. एकाच षटकात तीन गडी बाद करून दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकललं. दिल्लीच्या फलंदाजांना डोकं वर काढूच दिलं नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून कमी धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळालं. आता विजयाचं पारडं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पारड्यात झुकलं आहे.
मेग लेनिंगने 23 चेंडूत 23, शफाली वर्माने 27 चेंडूत 44, जेमिमाह रॉड्रिग्स 2 चेंडूत 0, एलिस कॅप्से 1 चेंडूत 0, मेरिझेन कॅप 16 चेंडूत 8, जेस जोनासेनने 11 चेंडूत 3, राधा यादव 9 चेंडूत 12, मिनू मनी 3 चेंडूत 5 धावा केल्या. बंगळुरुकडून सोफी मोलिनक्सने 4 षटकात 20 धावा देत तीन गडी बाद केले. तिचा हा स्पेल सर्वात बेस्ट राहिला. सोफी मोलिनक्सने 3, श्रेयंका पाटीलने 4 आणि आशा शोभनाने 2 गडी बाद केले. श्रेयंका पाटीलने 4 गडी बाद करत पर्पल कॅप आपल्या नावावर केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर 114 धावांचं सोपं आव्हान रोखण्याचं आव्हान आहे. आता दिल्ली कॅपिटल्स हे आव्हान गाठतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.