WPL Final : जेतेपदानंतर कर्णधार स्मृती मंधानाने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली…

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह जेतेपदावर नाव कोरलं आहे. गेल्या 16 वर्षांपासून जेतेपदाचं फ्रेंचायसीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अंतिम सामन्यातील विजयासाठी स्मृती मंधानाने या खेळाडूला श्रेय दिलं.

WPL Final : जेतेपदानंतर कर्णधार स्मृती मंधानाने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली...
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 11:44 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं जेतेपद अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवलं आहे. गेल्या पर्वात साखळी फेरीतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं होतं. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापूर्वी बंगळुरुचा संघ तिसऱ्या स्थानी होता. प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. तसेच दिल्ली कॅपिटल्सने याच स्पर्धेत बंगळुरुला दोनदा पराभूत केलं होतं. मात्र अंतिम फेरीत स्मृती मंधानाने कमाल केली आणि विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सने जबरदस्त सुरुवात केली होती. पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमवता 64 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर दिल्लीचा डाव ढासळला आणि मॅचवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पकड मिळवली. दिल्ली कॅपिटल्सने सर्वबाद 113 धावा केल्या आणि विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान बंगळुरुने 2 गडी गमवून शेवटच्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यातील विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधाने हीने मन मोकळं केलं आहे.

“जिंकल्यानंतर भावना व्यक्त करताना माझं मन भरून आलं आहे. काय करू असं झालं आहे. मी एक गोष्ट सांगेन की मला टीमचा अभिमान आहे. आम्ही बंगळुरुत चांगली कामगिरी केली. आम्ही दिल्लीत आलो आणि आम्हाला दोनदा पराभव पत्करावा लागला. त्याबद्दल आम्ही बोललो होतो की आम्हाला योग्य वेळी पाऊल उचलण्याची गरज आहे. या स्पर्धा योग्य वेळी आम्ही कमबॅक केलं. गेल्या वर्षाने आम्हाला बरंच काही शिकवलं. काय चुकलं, काय बरोबर झालं.” असं स्मृती मंधानाने सांगितलं.

“व्यवस्थापनाने फक्त सांगितले की ही तुमची टीम आहे, तुमच्या पद्धतीने तयार करा. आरसीबीसाठी ते बरेच काही आहे. ट्रॉफी जिंकणारी मी एकटी नाही, संघाने ट्रॉफी जिंकली आहे.”, असं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधानाने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.

पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.