WPL 2025, MI vs DC : अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली..
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल आता काही वेळातच लागणार आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम फेरीचा सामना होत आहे.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा जेतेपद कोण पटकावणार? याचा निकाल काही वेळातच लागणार आहे. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमनेसामने आले आहे. सलग तीन पर्वात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली आहे. मात्र मागच्या दोन पर्वात जेतेपद मिळवता आलं नाही. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली. आता पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इडियन्स हे संघ भिडणार आहेत. आता पहिल्या पर्वातील पराभवाचा वचपा दिल्ली काढणार की मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा जेतेपद मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सने जिंकला असून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग म्हणाली, आज रात्री आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. परिस्थिती तशीच राहणार आहे आणि संपूर्ण स्पर्धेत आमच्यासाठी ते काम करत आहे. आमच्याकडे ताजेतवाने होण्यासाठी काही वेळ होता आणि आम्ही आज रात्रीसाठी उत्साहित आहोत. ही आमच्यासाठी एक संधी आहे. चांगले खेळण्याची गरज आहे आणि आशा आहे की ही आमची सर्वोत्तम कामगिरी असेल. आमच्या संघात एक बदल आहे.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, आम्हीही गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. पण मला वाटतं की आमच्यासाठी काहीही चांगलं आहे. गेल्या चार सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. संतुलित राहणे आणि क्षणात टिकून राहणे हे आमच्यासाठी कामी आले आहे. त्यांनी या स्पर्धेत खरोखर चांगले क्रिकेट खेळले आहे. गेल्या आठवड्यात आमच्यासाठी चांगला गेला. पहिल्या हंगामातील आमच्याकडे खूप चांगल्या आठवणी आहेत. आज एक नवीन दिवस आहे, एक सुंदर दिवस आहे आणि आम्हाला आमच्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही त्याच संघासह उतरणार आहोत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सजीव सजाना, अमेलिया केर, अमनजोत कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेस जोनासेन, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, नल्लापुरेड्डी चरणी.