MI vs GG Women : WPL मधील पहिल्या ओव्हरपासून ते चैाकार, षटकार आणि विकेटचा मान मिळवत ‘या’ खेळाडूंची इतिहासात नोंद

आजचा सामना पहिलाच होता पण त्यातील पहिला चेंडू कोणत्या बॉलरने टाकला, पहिला चौकार, पहिला सिक्सर, पहिली विकेट कोणी आपल्या नावावर केली हे आपण पाहणार आहोत.

MI vs GG Women : WPL मधील पहिल्या ओव्हरपासून ते चैाकार, षटकार आणि विकेटचा मान मिळवत 'या' खेळाडूंची इतिहासात नोंद
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:40 PM

MI vs GG Women : वुमन्स आयपीएलमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स यांच्यात सुरू आहे. प्रथम फंलदाजी करणाऱ्या मुंबई इंडिअन्स संघाने 20 षटकात 207 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या 30 चेंडूत केलेल्या 65 धावांच्या जोरावर मुंबईला पहिल्या सामन्यात 200 धावांचा टप्पा पार करता आला. या सामन्याचा निकालासह प्रत्येक बॉलची इतिहासामध्ये नोंद होणार आहे. तर आजचा सामना पहिलाच होता पण त्यातील पहिला चेंडू कोणत्या बॉलरने टाकला, पहिला चौकार, पहिला सिक्सर, पहिली विकेट कोणी आपल्या नावावर केली हे आपण पाहणार आहोत.

गुजरात आणि मुंबईमधील मॅचमध्ये पहिला चेंडू गुजरात जायंट्स संघाची खेळाडू ऍशले गार्डनरने टाकला. मुंबईची सलामीवीर यास्तिका भाटियाने तो खेळला. पहिले चार चेंडू निर्धाव गेले होते त्यानंतर पाचव्या चेंडूवर पहिली धावा काढत यास्तिकाने संघाचं आणि स्वत: चं खातं उघडलं.

पहिला चौकार मारण्याचा मान हा मुंबईच्या हेली मॅथ्यूजने मिळवला. गुजरातची खेळाडू मानसी जोशीच्या षटकात मॅथ्यूज पहिला चौकार मारला. हेलीने संधीचं सोनं करत फक्त चौकारच नाहीतर पहिला सिक्सर मारण्याचा मानही मिळवला. आता राहिलं ते म्हणजे स्पर्धेतील पहिली विकेट, तर गुजरातच्या तनुजा कंवरने यास्तिका भाटियाला बाद करत हा मान मिळवला. तर पहिलं अर्धशतक हरमनप्रीत कौरनो ठोकलं आहे.

मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.