WPL आणि IPL मधील ‘हे’ नियम असणार वेगळे, ‘इतके’ DRS घेता घेणार!
वुमन्स आयपीएल आणि पुरूषांच्या आयपीएलमध्ये काही नियम वेगळे आहेत. नेमके कोणते वेगळे आहेत जाणून घ्या.
मुंबई : वुमन्स आयपीएलच्या (WPL 2023) पहिल्या सामन्याला काही तास बाकी शिल्लक आहेत. पहिला सामना गुजरात आणि मुंबईमध्ये होणार आहे. वुमन्स आयपीएलला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वुमन्स आयपीएल आणि पुरूषांच्या आयपीएलमध्ये काही नियम वेगळे आहेत. नेमके कोणते नियम वेगळे आहेत जाणून घ्या. बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईतल्या मैदानात केलं आहे. पाच टीम साखळी फेरीत एकमेकांशी दोनदा भिडणार आहे. म्हणजेच एक संघ अंतिम फेरीपूर्वी 8 सामने खेळणार आहे. साखळी फेरीत एकूण 20 सामने होतील.
अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच संघ भिडणार आहेत. पण 20 सामन्यानंतर तीन संघांचे सारखेच गुण असतील. तर मात्र रनरेटवर गुणांकन केलं जाईल. ज्या संघाचा रनरेट चांगला आहे तो संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी लढत करेल. अंतिम फेरीचा सामना अनिर्णित ठरला तर सुपर ओव्हर केली जाईल. पण सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित ठरला तर जिंकेपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाईल.
WPL च्या सामन्यांमध्ये चार स्ट्रेटिजिक टाइम आउट घेता येणार आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला 6 ते 9 व्या ओव्हरमध्ये त्याचा वापर करता येणार आहे. बॅटींग करणाऱ्या संघाला 13 ते 16 व्या ओव्हरवेळी याचा वापर करता येणार आहे. महत्त्वाचा निर्णय म्हणजे विकेट पडल्यावर पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी प्रत्येक संघाला 2 डीआरएस मिळणार आहेत. खेळाडू बाद झाल्यावर दुसरा खेळाडू 90 सेकंदाच्या आत मैदानात आला नाही तर त्या खेळाडूवर दंड आकरण्यात येणार आहे.
प्लेऑफमध्ये 3 संघ जाणार असून त्यातील पहिल्या क्रमांकावर असणारा संघ थेट अंतिम फेरी खेळणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या संघामध्ये लढत होणार असून त्यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये गेलेल्या संघासोबत भिडणार आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ असून एकूण 22 सामने खेळले जाणार आहेत. तर अंतिम सामना 26 मार्च 2023 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.