Team India | टीम इंडियासाठी धक्का; दुसऱ्या सामन्यालाही मुकणार स्टार बॅटर?

टीम इंडियाने पहिल्या सामन्यात धडाक्यात सुरुवात करुन विजय सुरुवात केली होती. मात्र दुखापतीमुळे या सामन्यात स्टार खेळाडूला दुखापतीमुळे मुकावं लागलं होत.

Team India | टीम इंडियासाठी धक्का; दुसऱ्या सामन्यालाही मुकणार स्टार बॅटर?
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 4:36 PM

मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1 डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं. तर दुसऱ्या बाजूला भारतीय महिला क्रिकेट टीमने टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मंधाना हीला दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागंल होतं. आता स्मृतीला विंडिज विरुद्धच्या सामन्यात खेळता येणार की नाही, याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया आज बुधवारी विंडिज विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्मृतीच्या दुखापतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे.

टीम इंडियाचे बॉलिंग कोच ट्रॉय कूली यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती विंडिजविरुद्धच्या सामन्याआधी फिट होईल, असा आशावाद कूली यांनी व्यक्त केला आहे. जर कूली यांचा अंदाज खरा ठरला तर स्मृती विंडिजविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.

हे सुद्धा वाचा

स्मृतीला टी 20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे स्मृतीला पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यााला मुकावं लागलं होतं.

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानचा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 7 विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 1 ओव्हरआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं.

जेमिमाह रॉड्रिग्ज आणि रिचा घोष या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. रिचाने पाकविरुद्ध 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. या खेळीमध्ये 5 चौकारांचा समावेश होता. तर जेमिमाहने 38 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या होत्या. जेमिमाहला तिने केलेल्या अर्धशतकी खेळीसाठी’मॅन ऑफ द मॅच’या पुरस्कारानै गौरवण्यात आलं.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध विंडिज, 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया |हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.