WTC 2023 Ind vs Aus : खेळपट्टीवर रहाणे-ठाकुरचा मराठी बाणा, असा साधला संवाद की मिळाली प्रेरणा…Watch Video

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थिती आहे. मात्र एक स्थिती अशी होती की भारताला फॉलोऑन मिळेल. पण रहाणे-शार्दुल जोडीने अशी खेळी आणि टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणलं.

WTC 2023 Ind vs Aus : खेळपट्टीवर रहाणे-ठाकुरचा मराठी बाणा, असा साधला संवाद की मिळाली प्रेरणा...Watch Video
WTC 2023 Ind vs Aus : मराठी माणूस आहे ना मग नो टेन्शन, रहाणे-ठाकुरने असा संवाद साधत टीम इंडियाला तारलं
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 3:30 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या जोडीने चांगली फलंदाजी केली. भारताला नाजुक स्थितीत या दोघांच्या खेळीने तारलं. 152 या धावसंख्येवर 6 गडी बाद असताना अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर ही जोडी मैदानात होती. त्यामुळे भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल असंच वाटत होतं. पण मराठी माणुस हार पत्कारेल असं कधी होईल का? अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरने खिंड लढवली. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक माऱ्याचा सामना केला. दोघांनी 7 व्या गड्यासाठी 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यावेळी दोघांनी खास मराठी बाणा मैदानावर अवलंबला. मराठीत संवाद साधत प्रत्येक स्ट्रॅटर्जी ठरवली आणि ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली.

प्रत्येक चेंडूवर रहाणे आणि शार्दुल जोडी मराठीत संवाद साधत होती. त्यांचं संभाषण मैदानातील माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजिंक्य रहाणे म्हणत होता, खेळत राहा खेळत राहा चांगलं आहे. शाब्बास..एक एक बॉल एक एक बॉल..चांगलं आहे खेळत राहा. ” त्यानंतर शार्दुलने अजिंक्यला सांगितलं की, पॉईंट मागे केलाय हा..

ऑस्ट्रेलिया सध्या मजबूत स्थिती आहे. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात 173 धावांची आघाडी होती. त्यात दुसऱ्या डावात धावांची भर पडत असून धावासंख्या 300 च्या पार गेली आहे. त्यामुळे गोलंदाजांनंतर फलंदाजांची कसोटी लागणार आहे. इतक्या धावांचा डोंगर गाठणं तसं भारताला कठीण आहे. पण ठरवलं तर काही होऊ शकतं हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे.

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या जोडीने सातव्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी केली. यात अजिंक्य रहाणें 129 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 89 धावा केल्या. तर शार्दुल ठाकुरने 109 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.