वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 ची अंतिम फेरी गाठणं टीम इंडियाला कठीण! असं का ते जाणून घ्या
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. असं असताना आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेचं वेळापत्रक टाकलं आहे. टीम इंडियाचा एकंदरीत वेळापत्रक पाहिलं तर खूपच कठीण आव्हान असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. चौथ्या पर्वात टीम इंडियासह नऊ संघ सहभागी होणार आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत कोणता संघ किती सामने खेळणार याचं वेळापत्रक समोर आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम सामना पार पडला की चौथ्या पर्वाची सुरुवात होणार आहे. या पर्वात टीम इंडिया 18 सामने खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक सहा मालिका खेळतो. यापैकी तीन होम ग्राउंड, तर तीन विदेशात खेळते. भारत या सायकलमध्ये सर्वात आधी इंग्लंड दौरा करणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार असून सर्वात कठीण दौरा असणार आहे. कारण या मालिकेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली तर आणि तरच अंतिम फेरीचं गणित सुटण्यास मदत होणार आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर मात देणं वाटतं तितकं सोपं नाही.
ऑस्ट्रेलियनं संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्याशी 2-2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे तिन्ही संघ भारतात येणार आहेत. त्यामुळे भारताला होम ग्राउंडचा अॅडव्हान्टेज घेता येईल. म्हणजेच भारतीय संघ 9 सामने भारतीय भूमीवर खेळणार आहे. मागच्या पर्वाच्या तुलनेत भारताच्या वाटेत एक कठीण पेपर असणार आहे. भारतीय संघाला या साखळीत श्रीलंका आणि न्यूझीलंड दौरा करायचा आहे.
भारतीय संघ श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध 2-2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यात हे दोन्ही दौरे कठीण असणार आहे. कारण न्यूझीलंडमध्ये वेगवान गोलंदाजीचा सामना, तर श्रीलंकेत फिरकीचा सामना करताना टीम इंडियाची पुरती त्रेधातिरपीट उडणार आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतच पुढचं गणित काय ते ठरत जाणार आहे. त्यामुळे या 9 सामन्यात टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे. कारण या साखळीत बांगलादेशसारखं लिंबूटिंबू संघ नाही. मागच्या पर्वात दोन सामन्यात भारताने 2-0 ने मात दिली होती. त्यामुळे भारताची विजयी टक्केवारी वाढली होती. पण यंदा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत टीम इंडिया एकूण 19 सामने खेळली. यात 9 सामन्यात विजय, 8 सामन्यात पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले. भारताची विजयी टक्केवारी ही 50 टक्के असून तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिसऱ्या पर्वात क्वॉलिफाय करू शकली नाही. मागच्या दोन पर्वात टीम इंडियाने क्वॉलिफाय केलं होतं. पण दोन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं. एकदा न्यूझीलंडने, तर एकदा दक्षिण अफ्रिकेने पराभूत केलं.