WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने हरवलं वेस्ट इंडिजला पण भारताचं टेन्शन वाढलं, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार कस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी नऊ संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक कसोटी मालिका आणि सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र पालटतं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करताच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने हरवलं वेस्ट इंडिजला पण भारताचं टेन्शन वाढलं, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार कस
WTC 2025 : ऑस्ट्रेलियाच्या खेळीने भारताचं अंतिम फेरीत गणित फिस्कटणार! इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकावीच लागणार
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 3:06 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटला काही अंशी सुवर्णकाळ प्राप्त झाला आहे, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक संघ कसोटी मालिका जिंकण्यावर भर देत आहे. कारण विजयी टक्केवारी गुणतालिकेचं गणित पालटून टाकते. त्यामुळे कसोटी सामना आणि मालिका गुणतालिकेचं गणित बदलतं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. होम ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजणं वाटतं तितकं सोपं नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजला 188 धावांवर सर्वबाद केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 283 धावा करत पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज संघ आघाडी मोडण्यापूर्वीच निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला. संबूर्ण संघ 120 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 26 धावांचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही गडी न गमवता पूर्ण केलं. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने विजयी टक्केवारीत फायदा झाला. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण पुढचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पहिलं स्थान गाठण्याचं भारतासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया 61.11 टक्क्यांसह पहिल्या, भारत 54.16 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्के विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 36.66 टक्क्यांसह सहाव्या, इंग्लंड 15 टक्क्यांसह सातव्या वेस्ट इंडिज 11.11 टक्क्यांसह आठव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेने एकही विजय किंवा सामना ड्रॉ केला नसल्याने शून्य टक्क्यांसह शेवटच्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचीत 5.96 टक्क्यांचा फरक आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजसोबत शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. तर भारताला इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताला ऑस्ट्रेलियाला गुणतालिकेत मागे टाकायचं असेल तर सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर षटकांचं गणित वेळेत सोडवणं गरजेचं आहे. कारण स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीतले गुण कापले जातात. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 2 गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी काळजी घ्यावी लागेल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....