WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतापेक्षा बांगलादेश वरचढ, जिंकूनही इंग्लंडचा तोटाच
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर उलटफेर दिसून येतो. असाच फरक भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिसून आला. भारताला मोठा फटका बसला असून बांगलादेशचा संघ वरचढ ठरला आहे. भारताची अंतिम फेरीची वाट बिकट झाली आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत विरुद्ध इंग्लंडसामन्यानंतर बराच फरक दिसून आला आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अपेक्षेप्रमाणे विपरीत लागला. इंग्लंडने भारताला मायदेशात पराभूत केलं आहे. तसेच बेझबॉल काय असतं याची प्रतिची दाखवून दिली आहे. भारतीय संघ वारंवार काही खेळाडूंवर अवलंबून असल्याचं यातून दिसून आलं. त्यानुसार इंग्लंडने रणनिती आखली आणि भारताला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात काही खास करता आलं नाही. भारतीय मातीशी जुळवून घेताना इंग्लंडला थोडा वेळ लागला. मात्र दुसऱ्या डावात आपली बेझबॉल रणनिती काय आहे ते दाखवून दिलं. चौथ्या दिवशीत कसोटीचा निकाल लागला. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 246 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात 436 धावा केल्या. मग इंग्लंडने दुसऱ्या डावात तोडीस तोड उत्तर दिलं. भारताची आघाडी मोडून काढत 230 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं. पण भारताचं संघ फक्त 202 धावा करू शकला आणि 28 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. बांगलादेशचा संघ भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न पहिल्याच कसोटीत संपुष्टात आलं आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपची अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी टक्केवारी 55 सह अव्वल स्थानी आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भारताची दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 43.33 झाली आहे.
The latest #WTC25 standings following 24 hours of box office Test match cricket 🎟#AUSvWI #INDvENG pic.twitter.com/YL6C4oJGwQ
— ICC (@ICC) January 29, 2024
पाकिस्तानचा संघ 36.66 विजयी टक्केवारीसह सहाव्या, 33.33 टक्क्यांसह वेस्ट इंडिज सातव्या, 29.16 टक्क्यांसह इंग्लंडचा संघ आठव्या, तर शून्य विजयी टक्केवारीसह श्रीलंकेचा संघ एकदम तळाशी आहे. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर करण्यासाठी ही कसोटी मालिका खरं तर 5-0 ने जिंकणं गरजेचं होतं. पण पहिल्या कसोटीत मात खाल्ल्यानंतर उर्वरित 4 सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. अन्यथा अंतिम फेरी गाठणं कठीण होईल.