IND vs PAK: टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात होणार WTC Final? असं आहे समीकरण

India vs Pakistan Wtc Final Scenario: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. आता या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील अंतिम सामना होऊ शकतो का? त्याचं समीकरण आपण जाणून घेऊयात.

IND vs PAK: टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात होणार WTC Final? असं आहे समीकरण
team india pakistan babar azam
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 12:22 AM

टीम इंडिया सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या गदेने हुलकावणी दिली. टीम इंडियाला 2021 साली न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर त्यानंतर 2023 साली ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर मात केली. आता सध्या टीम इंडिया या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसर्‍या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी सातव्या स्थानी आहे. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महामुकाबला व्हावा, अशी आशा आहे. हे शक्य आहे का? पाकिस्तानला फायनलसाठी किती सामने जिंकावे लागतील? त्याचं समीकरण जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीत पाकिस्तान आणखी 9 सामने खेळणार आहे. पाकिस्तानने या 9 पैकी 7 सामने जिंकले, तर ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 पैकी अधिक सामने गमावले, तर त्यांचं अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न पुन्हा भंग होऊ शकतं. तसेच पाकिस्तानने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 सामने अनिर्णित राहिले आणि 1 गमवला तरीही ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 सामने गमावले आणि 1 मॅच ड्रॉ राहिली तर शेजाऱ्यांसाठी जर तरची स्थिती असेल.

टीम इंडियाचं समीकरण

टीम इंडियाला आतापर्यंत या तिसऱ्या साखळीत 10 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने 10 पैकी 7 सामने जिंकले तर अंतिम फेरीत प्रवेश करेल. मात्र टीम इंडियाने 3 पेक्षा अधिक सामने गमावले, तर अंतिम फेरीत पोहचण्याची हॅटट्रिक हुकेल.

टीम इंडिया नंबर 1

टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी

टीम इंडियाने या साखळीतील 10 पैकी 6 सामने जिंकले तर 2 सामने गमावले आणि 2 सामने बरोबरीत सोडवण्यात यश आलं, तरीही रोहितसेना फायनलमध्ये पोहचेल. तसेच टीम इंडियाने 5 सामने जिंकले, 3 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले, अशा परिस्थितीत रोहितसेनेला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल. या सर्व जरतरचं समीकरण जुळून आले, तरच टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात अंतम सामना होऊ शकतो.

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.