WTC 2025: आयसीसीच्या त्या नियमाचा ऑस्ट्रेलिया इंग्लंडला बसला फटका, उस्मान ख्वाजा स्पष्टच बोलला की..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेच्या साखळी फेरीला सुरुवात झाली आहे. आयसीसीच्या एका नियमाचा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जबर फटका बसला असून वेस्ट इंडिजला फायदा झाला आहे.

WTC 2025: आयसीसीच्या त्या नियमाचा ऑस्ट्रेलिया इंग्लंडला बसला फटका, उस्मान ख्वाजा स्पष्टच बोलला की..
WTC 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाला चूक भोवली! उस्मान ख्वाजाने भडकला आणि म्हणाला..Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 9:28 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे कसोटी मालिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. प्रत्येक कसोटी सामना अंतिम फेरीच्या दिशेने महत्त्वाचा आहे. मालिका जिंकण्यासोबत विजयी टक्केवारी चांगली राखणंही तितकंच महत्वाचं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत एकूण 9 संघ असून टॉपच्या दोन संघांमध्ये अंतिम फेरीची लढत होते. पहिल्या पर्वात न्यूझीलंड आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. दोन्ही वेळेस भारताच्या पदरी निराशाच पडल्याचं दिसून आलं आहे. तिसऱ्या पर्वात चांगल्या कामगिरीची भारताकडून अपेक्षा आहे. मात्र सुरुवातीपासून गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. आयसीसीच्या नव्या नियमाचा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला फटका बसला आहे. यावरून ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा याने आयसीसीवर टीका केली आहे.

उस्मान ख्वाजाने चौथ्या कसोटीत स्लो ओव्हर रेटसाठी संघाला दंड ठोठवल्याप्रकरणी कानउघडणी केली आहे. स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीत 10 गुण कापण्यात आले आहेत. दुसऱ्या डावात गोलंदाजीची संधीच मिळाली नसताना गुण कोणत्या आधारावर कापले असा सवाल त्याने आयसीसीला विचारला आहे.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत इंग्लंडला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. पाच पैकी चार सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीतून 19 गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे इंग्लंड पाचव्या स्थानावर तर वेस्ट इंडिजची वर्णी चौथ्या स्थानी लागली आहे.

आयसीसीने सांगितलं की, “नव्या नियमानुसार निर्धारित वेळेत प्रत्येक ओव्हर न टाकल्याने मॅच फीसमधून पाच टक्के दंड आणि एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिन गुण कापला जाणार आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटी दोन षटकं , दुसऱ्या कसोटीत नऊ षटकं, चौथ्या कसोटीत तीन आणि पाचव्या कसोटीत पाच षटकं कमी टाकली.”

WTC_2025

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणांसह विजयी टक्केवारी महत्त्वाची आहे. स्लो ओव्हर रेटमुळे विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी हे गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक संघाला वेळेचं पालन करावं लागणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.