WTC 2025 : भारत-पाकिस्तानच्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा उलटफेर, ऑस्ट्रेलियाला हवा तसा फायदा नाहीच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं सर्कल पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. त्यापैकी सहा महिन्यांचा काळ लोटला असून 2024 वर्ष खूप महत्त्वाचं आहे. या वर्षात कसोटीतील प्रत्येक जय पराजय अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहे. पाकिस्तानने सलग दोन सामन्यात पराभव सहन केल्याने मोठा उलटफेर झाला आहे.

WTC 2025 : भारत-पाकिस्तानच्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा उलटफेर, ऑस्ट्रेलियाला हवा तसा फायदा नाहीच
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम फेरीसाठी चुरस वाढली, पाकिस्तानच्या पराभवामुळे उलथापालथ
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 3:31 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत एकूण 9 संघ आहेत. यापैकी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना 2025 या वर्षी होणाऱ्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रत्येक कसोटी मालिका आणि सामन्याला महत्त्व आहे. एक पराभव आणि विजय गुणतालिकेत मोठ उलटफेर घडवून आणत आहे. त्यात स्लो ओव्हर रेटमुळे संघांचं नुकसान देखील होत आहे. इंग्लंडला 19, ऑस्ट्रेलियाला 10 आणि भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी दोन गुणांची पेनल्टी लागली आहे. त्याचा थेट परिणाम विजयी टक्केवारीवर होत आहे. कारण पेनल्टी विजयी टक्केवारीतून वजा केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका हा इंग्लंडला बसल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसरा पराभव आणि दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केल्याने गुणतालिकेवर मोठा फरक दिसून येत आहे.

दक्षिण अफ्रिकने 1 डाव आणि 32 धावांनी सामना जिंकला. तसेच विजयी टक्केवारी 100 इतकी असल्याने थेट पहिलं स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश विजयी टक्केवारी 50 सह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर पाकिस्तान 45.83 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ 38.89 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 16.67 विजयी टक्केवारीसह सातव्या, इंग्लंड 15 विजयी टक्केवारीसह आठव्या, तर श्रीलंकेना एकही सामना न जिंकल्याने गुणांकन शुन्य आहे.

WTC_Point_Table (1)

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम फेरीसाठी चुरस वाढली, पाकिस्तानच्या पराभवामुळे उलथापालथ

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक सामना उरला आहे. या सामन्याच्या निकालाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर दिसून येईल. त्यामुळे प्रत्येक संघाला विजयी टक्केवारीसह, स्लो ओव्हर रेटचं गणित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न अवघ्या काही पॉइंट्स हुकू शकतं.

पाकिस्तानचा तिसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान आहे. तर दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत हा कसोटी सामना देखील या दरम्यानच आहे. त्यामुळे आता चारही कशी कामगिरी करतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सामन्याचा कोणताही निकाल गुणतालिकेवर प्रभाव पाडणार हे मात्र नक्की आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.