WTC 2025 : कसोटीत न्यूझीलंडची दक्षिण अफ्रिकेवर 281 धावांनी मात, ऑस्ट्रेलिया आणि भारताला बसला मोठा फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामन्याला महत्त्व आलं आहे. नुकताच पार पडलेल्या न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका सामन्याचाही असाच परिणाम दिसून आला आहे. इंग्लंडला पराभूत करून भारताने दुसरं स्थान गाठलं होतं. पण न्यूझीलंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया भारत या दोन्ही संघांना फटका बसला आहे.

WTC 2025 : कसोटीत न्यूझीलंडची दक्षिण अफ्रिकेवर 281 धावांनी मात, ऑस्ट्रेलिया आणि भारताला बसला मोठा फटका
WTC 2025 : न्यूझीलंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी झेप, भारत ऑस्ट्रेलियाचं झालं मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 3:18 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर प्रत्येक कसोटी सामन्यानंतर फरक दिसून येत आहे. एका पराभव, ड्रा आणि विजय सर्वच गणित पालथून टाकतो. न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याने असाच फरक पडला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामना न्यूझीलंडने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. पण त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच गणित फसलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावांची खेळी केली. तसेच दक्षिण अफ्रिकेला 162 धावांवर रोखलं. त्यामुळे पहिल्या डावात 449 धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱ्या डावात 4 गडी बाद 179 धावा करत डाव घोषित केला. न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 528 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं तसं अशक्यप्राय होतं. दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 247 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडने 281 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिलं स्थान गाठलं आहे. तर भारत ऑस्ट्रेलिया यांना फटका बसला आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत एकूण 3 कसोटी सामने खेळले असून एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दोन सामन्यातील विजयामुळे विजयी टक्केवारी ही 66.66 इतकी झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 6 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव तर एक सामना ड्रा झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 55 टक्के आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर भारताने इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 52.77 इतकी झाली असून तिसरं स्थान गाठलं आहे.

WTC_Point_Table (3)

बांगलादेश 50 टक्के विजयी टक्केवारीसह चौथ्या, पाकिस्तान 36.66 टक्क्यांसह पाचव्या, वेस्ट इंडिज 33.33 टक्क्यांसह सहाव्या, दक्षिण अफ्रिका 33.33 टक्क्यांसह सातव्या, इंग्लंड 25 टक्क्यांसह आठव्या, तर श्रीलंक 0 टक्क्यांसह सर्वात शेवटी आहे.

न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यातील निकाल पुन्हा गुणतालिकेवर प्रभाव पाडेल. भारत इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.