WTC Final Scenarios : दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारत अंतिम फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असं असताना भारत आता अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात.

WTC Final Scenarios : दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारत अंतिम फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 3:20 PM

भारत विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दोन स्थानांची घसरण झाली आहे. अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाल्यानंतर भारतीय संघ आता अंतिम फेरी गाठणार की नाही असा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया संघ एकूण 60.71 विजयी टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका संघाने 59.26 विजयी टक्केवारीसह दुसरे स्थान कायम राखले आहे. ॲडलेड कसोटी सामना हरलेली टीम इंडिया 57.29 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीत अजूनही कायम आहे. पण काही समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजून तीन सामने बाकी आहेत, टीम इंडिया हे सामने जिंकून आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 4-1 ने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते.

भारताने कसोटी मालिका 4-1 मालिका जिंकल्यास भारताचे 146 गुण आणि 64.05 विजयी टक्केवारी होऊ शकते. त्यामुळे सध्या अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची गोची होईल. पण ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामने जिंकणे हे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असेल.

भारताने मालिका 3-1 ने जिंकली, तर गणित वेगळं असेल. पुढील तीन सामन्यांपैकी एक सामना ड्रा झाला आणि दोन जिंकले तर भारताचे 138 गुण आणि 60.52 विजयी ट्क्केवारी होईल. अशा परिस्थितीती ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 57 होईल. पण ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेविरुद्ध 2 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे ही स्थिती भारताच्या हातात नसेल. दक्षिण आफ्रिकेनेही अंतिम फेरीसाठी दावा केला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाला मालिकेत 3-2 ने पराभूत केले. तर भारताचे 134 गुण आणि 58.77 विजयी टक्केवारी होईल. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीसाठी संधी मिळेल. कारण श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना सुरु आहे आणि विजयी होईल अशी स्थिती आहे. तर घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळीवर भारताचं स्थान ठरेल.

भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी श्रीलंकेच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत जाणार आहे. घरच्या मैदानावर दोन नाही तर किमान एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.