WTC Final 2025 : मेलबर्न कसोटीत पराभव झाला तरी टीम इंडिया अंतिम फेरी गाठणार! जाणून घ्या 4 समीकरणं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेची चुरस आता रंगतदार वळणावर आली आहे. साखळी फेरीतील कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका शर्यतीत आहे. पण एका समीकरणामुळे श्रीलंकेलाही संधी आहे. कसं ते समजून घ्या.

WTC Final 2025 : मेलबर्न कसोटीत पराभव झाला तरी टीम इंडिया अंतिम फेरी गाठणार! जाणून घ्या 4 समीकरणं
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 12:59 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून पाच संघ आऊट झाले आहेत. श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी काठावरची शक्यता आहे. तर भारताला अंतिम फेरीसाठी दोन्ही सामने जिंकणं भाग आहे असं काहीसं समीकरण गेल्या दिवसात मांडलं जात आहे. ते खरंही आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरी गाठेल यात शंका नाही. पण दोन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर भारताला अंतिम फेरीची संधी मिळू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्याचं हो असं आहे. भारताचे उर्वरित सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयाच अंतिम फेरीच्या चार समीकरणांबाबत..

भारताने मालिका 2-1 ने जिंकली तर…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामना बाकी आहेत. त्यापैकी भारताने एका सामन्यात विजय मिळवला आणि एक ड्रॉ झाला तर भारताचे 55.26 विजयी टक्केवारी होईल. दुसरीकडे, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत गुणातलिकेत दुसऱ्या स्थानी राहील आणि अंतिम फेरीत स्थान मिळवेल.

भारत ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर..

मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात एक सामना भारताने आणि एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर 2-2 अशी बरोबरी राहील. तेव्हाही भारताची विजयी टक्केवारी ही 55.26 राहील. अशा स्थितीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत अंतिम फेरीत स्थान मिळवेल.

भारत ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली तर..

मालिकेतील पुढचे दोन्ही सामने ड्रॉ झाले आणि मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली तर भारताची विजयी टक्केवारी 53.51 राहील. अशा स्थितीतही श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत अंतिम फेरीत स्थान मिळवेल.

पाकिस्तानकडूनही भारताला मदत होऊ शकते..

भारत ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 बरोबरीत सुटली तर पाकिस्तानकडून मदत होऊ शकते. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत केलं तर भारत 53.51 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. तर दुसऱ्या अंतिम फेरीतील संघ श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलिया असू शकते. म्हणजेच पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत केलं भारताच्या आशा वाढतील.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.