WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर, पाकिस्तान बांगलादेश सामन्यानंतर असा पडला फरक

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत लोळवलं आहे. पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला. बांगलादेशने कसोटी मालिकेत इतिहास घडवला आहे. असं असताना बांगलादेशच्या विजयाने मोठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर, पाकिस्तान बांगलादेश सामन्यानंतर असा पडला फरक
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 3:34 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना जून महिन्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघांमध्ये चढाओढ दिसत आहे. पाकिस्तान बांगलादेश सामन्यानंतर या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. दोन सामन्यांची कसोटी बांगलादेशने 2-0 ने जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. यासह पाकिस्तानचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावरून थेट आठव्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईटवॉश देत गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर होता. तसेच विजयी टक्केवारी 35 होती. पण पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताच बांगलादेशने मोठी झेप घेतली आहे. थेट सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. बांगलादेशची विजयी टक्केवारी ही आता 45.83 झाली आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडपेक्षा वरचढ ठरला आहे.  दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 19.05 इतकी आहे. यापूर्वी ही टक्केवारी 22.22 इतकी होती.

दुसरीकडे, भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताची विजयी टक्केवारी 68.52 इतकी आहे. त्यामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आता उर्वरित दहा कसोटी सामन्यापैकी सात सामने जिंकले भारताचं अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. याच महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्याने ही मालिका वाटते तितकी सोपी नसेल हे देखील तितकंच खरं आहे.

WTC_Point_Table (2)

ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी असून दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 6 पैकी 3 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 50 इतकी असून तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडने 15 कसोटी सामने खेळले असून त्यात 8 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी 45 इतकी असून पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने 6 पैकी 2 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. विजयी टक्केवारी ही 38.89 इतकी असून सहाव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने 6 पैकी 2 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. विजयी टक्केवारी ही 33.33 इतकी असून सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने 9 पैकी एका सामन्यात विजय, सहा सामन्यात पराभव आणि 2 सामने ड्रॉ झाले आहेत. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 18.52 इतकी असून नवव्या स्थानावर आहे..

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.