WTC 2025 : इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना जिंकूनही तसा फायदा नाही, न्यूझीलंडने भारताचं स्वप्न लांबवलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक सामन्याचं महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामन्यातील निकालाचं प्रभाव गुणतालिकेवर पडत असतो. न्यूझीलंडने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकत आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे. तर भारताच्या पुढील वाटचालीत अडसर करून ठेवला आहे.

WTC 2025 : इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना जिंकूनही तसा फायदा नाही, न्यूझीलंडने भारताचं स्वप्न लांबवलं
WTC 2025 : भारताच्या वाटेत पुन्हा एकदा न्यूझीलंडचा अडसर, तिसरा कसोटी सामना जिंकूनही फरक पडणार नाही
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:57 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पाच सामन्यातील मालिकेत आघाडी घेण्यासाठी विजय महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या विजयाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर फरक पडणार आहे. पण भारताचं अव्वल स्थान मिळवण्याचं स्वप्न या विजयानंतरही साध्य होणार नाही. कारण न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्वीप दिल्याने विजयी टक्केवारीत फायदा झाला आहे. तसेच आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तर दक्षिण अफ्रिकेला मोठा फटका बसला आहे. तर भारताला अव्वल स्थान गाठण्यासाठी सध्या सुरु असलेल्या सामन्यासोबत इतर दोन सामन्यात विजय मिळवायला लागणार आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकून गुणतालिकेत फार फार तर दुसरं स्थान गाठता येईल. मात्र अव्वल गाठण्यासाठी उर्वरित तिन्ही कसोटी सामने जिंकणं गरजेचं आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळले असून तीन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 75 असून अव्वल स्थान गाठलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने 10 पैकी 6 सामन्यात विजय, 3 सामन्यात पराभव तर एक सामना ड्रॉ झाला आहे. तर पेनल्टीच्या रुपाने 10 गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे 55 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाने 6 पैकी 3 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. विजयी टक्केवारी 52.77 इतकी असून तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे अव्वल स्थान गाठण्यासाठी तिन्ही सामने जिंकावे लागतील.

WTC_Point_Table (4)

बांगलाने 2 कसोटीपैकी 1 मध्ये विजय आणि 1 पराभव सहन केला आहे. 50 टक्क्यांसह बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने 5 पैकी 2 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. विजयी टक्केवारी 36.66 सह पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजने 4 पैकी एका सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि 1 ड्रॉ करण्यात यश मिळवलं. वेस्ट इंडिज 33.33 टक्क्यांसह सहाव्या स्थानी आहे.

इंग्लंडने एकूण 7 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय, 3 सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे. तर पेनल्टीच्या रुपाने 19 गुण कापले आहेत. त्यामुळे विजयी टक्केवारी 25 असून सातव्या स्थानी आहे. दक्षिण अफ्रिकन संघाची चौथ्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरण झाली आहे. 4 पैकी एका सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विजयी टक्केवरी 25 असून आठव्या स्थानी आहे. तर श्रीलंकेने दोन सामने खेळले आणि दोन्ही गमावले म्हमून विजयी टक्केवारी 0 असून शेवटी आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.