India Tour Of England | टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
Indian Cricket Team | टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात एकूण 5 साम्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जाणून घ्या सविस्तर.
मुंबई | क्रिकेट टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौरा करणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. टीम इंडिया आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर या दौऱ्याच्या तयारीला लागणार आहे. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड याच्यांत 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेन्यू अर्थात क्रिकेट सामन्याचं आयोजन कुठे होणार, त्या स्टेडियमची नावंही जाहीर केली आहेत.
टीम इंडिया 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हे 5 कसोटी सामने क्रिकेटची पंढरी असेल्या लॉर्ड्स, एजबेस्टन, हेंडिग्ले आणि ओल्ड ट्रेफर्डमध्ये खेळवण्यात येणार आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस सीरिज 2027 चं आयोजनही युकेमध्ये करण्यात येणार आहे.
अॅशेस सीरिज 2027 मधील सामने हे लॉर्ड्ससह एजबेस्टन, ट्रेन्ट ब्रिज आणि एजस बाऊलमध्ये खेळवण्यात येतील. तसेच टीम इंडिया 2029 मध्येही इंग्लंडचा दौरा करेल. या दौऱ्यातही टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या टेस्ट सीरिजसाठीबी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टेडियमची नावं जाहीर केली आहेत.
टीम इंडियाचं असं आहे वेळापत्रक
दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023-25 साठी टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर झालंय. टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टीम इंडिया 2 कसोटी मालिकेने करणार आहे. टीम इंडियाच्या विंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मधील मोहिमेला सुरुवात करणार आहे.
त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल. त्यानंतर टीम इंडिया जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. तसेच टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये टेस्ट सीरिज खेळेल.
दरम्यान टीम इंडिया आता जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्यात वेस्टइंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून होणार आहे. या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवड समिती कोणाला संधी देतं हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.