WTC Final 2023 | टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलमध्ये विजयी होणार का?
Wtc Final 2023 | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी 444 धावांचं आव्हान दिलंय. आता हे आव्हान टीम इंडिया पूर्ण करणार का?

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजायसाठी 444 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलंय. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाला 296 धावांवर ऑलआऊट केलं. यामुळे दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 84.3 ओव्हरमध्ये 8 बाद 270 धावांवर घोषित केला. यामुळे टीम इंडियाला 444 धावांचं आव्हान मिळालं. आता या विजयी आव्हान गाठण्यासाठी टीम इंडियाला मोठ्या भागीदारीची गरज आहे. या दरम्यान टीम इंडिया हा सामना जिंकणार का, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
यानिमित्ताने आपण कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत किती धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आलाय हे जाणून घेऊयात. सोबतच ओव्हलमध्ये चौथ्या डावात किती धावा यशस्वीपणे करता आल्या आहेत, हे सुद्धा जाणून घेऊयात.
टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड करणार?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच इतक्या रन चेस झालेल्या नाहीत. टेस्ट क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी विंडिजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 418 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं.
तर टीम इंडियाने एकदाच 400 पेक्षा अधिक धावांचं आव्हान गाठण्यात यश मिळवलंय. टीम इंडियाने 1976 साली विंडिज विरुद्ध 406 धावा पूर्ण करत विजय साकारला होता. त्यामुळे आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं असेल,तर रेकॉर्ड करावा लागेल.
ओव्हलमधील इतिहास काय?
लंडनमधील द ओव्हल या क्रिकेट ग्राउंडमधील इतिहास आपण जाणून घेतोय.या मैदानात गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात इतक्या रन चेज झालेल्या नाहीत. 400 धावाच काय, इथे 270 पेक्षा अधिक धावाही चेज झालेल्या नाहीत.
ओव्हलमध्ये 263 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. इंग्लंडने आजपासून 121 वर्षांआधी 1902 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती. तेव्हापासून हा रेकॉर्ड कायम आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं असेल, तर वर्ल्ड रेकॉर्ड करावा लागेल.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.