Icc Test Ranking | आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा बोलबाला
WTC Final 2023 AUS vs IND | ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जिंकल्यानंतर मोठी गुडन्यूज आली आहे. तर टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे.
मुंबई | ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियावर 209 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या विजयासह सर्व फॉर्मेटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली, जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर टीम इंडियाचं या पराभवामुळे सलग आणि एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. या सामन्यातील ओव्हर रेट न राखल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाला दंड ठोठावण्यात आला. टीम इंडियाला पराभवासह सामन्याचं सर्व 100 टक्के मानधन दंड म्हणून द्यावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडियासाठी आणखी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे.
आयसीसीने टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीच्या या रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज हे टॉप 3 मध्ये आहेत. या पैकी 1 फलंदाजाने आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. तर दोघांना चांगलाच फायदा झालाय. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी या रँकिंगमध्ये चांगलीच मोठी झेप घेतलीय.
आयसीसी टेस्ट रँकिंग
A unique stat repeats itself after nearly 39 years in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings ?
More ?https://t.co/7sP4bhf19W
— ICC (@ICC) June 14, 2023
अव्वल स्थानी कोण?
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मार्नस लाबुशेन यानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. मार्नस लाबुशेन याच्या नावावर 885 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर स्टीव्हन स्मिथ याने एका स्थानाचा फायदा झालाय. स्टीव्हने तिसऱ्यावरुन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय. स्टीव्हच्या नावावर 884 पॉइंट्स आहेत. तर ट्रेव्हिस हेड याने 3 स्थानांनी थेट 6 व्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतलीय. ट्रेव्हिसच्या नावे 883 पॉइंट्स आहेत. विशेष बाब म्हणजे मार्नस, स्टीव्हन आणि ट्रेव्हिस या तिघांच्या पॉइंट्समध्ये फक्त 1 ने फरक आहे.
ऑस्ट्रेलियाच्या त्रिमुर्तींचा धमाका
ICC Test batsmen ranking;
1) Labuschagne – 9032) Steve Smith – 8853) Travis Head – 884
The dominance of Australia. pic.twitter.com/DBZMjytIA0
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2023
ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील कामगिरीचा चांगलाच फायदा झालाय. या दोघांनी टीम इंडिया विरुद्ध WTC FINAL मध्ये पहिल्या डावात शतकी कामगिरी केली. होती. ट्रेव्हिस हेड याने 163 आणि स्टीव्हने 121 धावांची खेळी केली होती. तर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजुने झुकला होता. तर दुसऱ्या डावात स्टीव्हने 34 आणि हेडने 18 धावा केल्या होत्या.