WTC Final 2023 India vs Australia Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण मारणार बाजी?

IND vs AUS WTC Final 2023 Live Streming | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात टेस्ट वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी सामना रंगणार आहे. जाणून घ्या या सामन्याबाबत सर्वकाही.

WTC Final 2023 India vs Australia Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 12:41 AM

लंडन | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महाअंतिम सामना हा बुधवारी 7 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. आयसीसीने या सामन्याचं आयोजन हे लंडनमध्ये केलं असल्याने दोन्ही संघांना होम कंडीशनचा फायदा होणार नाही. त्यामुळे दोन्ही संघांना चांगलाच जोर लावावा लागणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत आपण सविस्तर आणि महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाअंतिम सामना हा बुधवारी 7 जून l ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या सामन्याला आधी भारतीय वेळेनुसार साडे तीन वाजता सुरुवात होणार होती. मात्र आता हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

सामन्याचं आयोजन कुठे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हल इथे करण्यात आलं आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघता येणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मॅचचं थेट प्रक्षेपण हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

मोबाईल आणि लॅपटॉपवर कसा पाहता येणार सामना? (ind vs aus wtc final digital streming)

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला हा हॉटस्टार एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. मात्र त्यासाठी सब्सक्रिप्शन असणं बंधनकारक आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.