WTC Final 2023, AUS vs IND | “टीम इंडिया आता जिंकूच शकत नाही”

WTC Final 2023 IND vs AUS 2nd Day | ऑस्ट्रेलियाला 500 धावांआधी ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र सर्व बट्टयाबोळ झाला.

WTC Final 2023, AUS vs IND | टीम इंडिया आता जिंकूच शकत नाही
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:31 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. सामन्याच्या सुरुवातील टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 3 विकेट्स घेऊन चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने टीम इंडियाच्या गोलंदाजांना रडवलं. या दोघांनी पहिल्या दिवसापर्यंत शानदार भागीदारी करुन नाबाद परतले. मात्र दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं.

स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिल हेड या दोघांनी 285 धावांची भागीदारी केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेलीच. मात्र मोहम्मद सिराजने हेड-स्मिथ ही जोडी फोडली. त्यानंतर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी सिराजला चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या दिवशी ठराविक अंतराने आऊट केलं. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने ऑलआऊट 469 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डावातील बॅटिंग झाली. आता टीम इंडिया मैदानात बॅटिंगसाठी येण्याच्या तयारी होती. या दरम्यान माजी दिग्गज मैदानात सामन्यात चर्चा करत होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि इतरांचा समावेश होता. या दरम्यान रिकी पॉन्टिंग म्हणाला की टीम इंडिया इथून जिंकू शकत नाही.

हे सुद्धा वाचा

पॉन्टिंग काय म्हणाला?

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट झाल्यानंतर पॉन्टिंगला टीम इंडियाने कमबॅक केलंय का, असं विचारण्यात आलं. यावर पॉन्टिंगने नाही असं उत्तर दिलं.

“नाही, टीम इंडिया कमबॅक करु शकलेली नाही. गवताबाहेरील खेळपट्टीचा भाग हा कोरडा आहे. खेळपट्टीत साधारण असमान उसळी आहे. आताही सीममध्ये मूवमेंट आहे. टीम इंडिया इथून जिंकू शकत नाही”, अशी पॉन्टिंगने भविष्यवाणी केली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.