Ajinkya Rahane | रहाणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ‘अजिंक्य’, Wtc Final 2023 मध्ये मोठा रेकॉर्ड
Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणे याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा कारनामा केला आहे. जाणून घ्या रहाणेने नक्की काय केलंय.
लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. या पहिल्या सत्रात टीम इंडियाने केएस भरत याची एकमेव विकेट गमावली. तसेच टीम इंडियाने या सत्रात 109 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे 6 विकेट्स गमावून 60 ओव्हरमध्ये 260 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या तुलनेत टीम इंडिया अजूनही 209 धावांनी पिछाडीवर आहे.
केएस भरत आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी लंचब्रेकपर्यंत सातव्या विकेटसाठी 108 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. या भागीदारी दरम्यान अजिंक्य रहाणे याने कसोटीतील 26 वं अर्धशतक पूर्ण केलं. रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय ठरला.
तसेच अजिंक्य रहाणे याने कसोटी कारकीर्दमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रहाणे कसोटीमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा 13 वा भारतीय ठरला आहे. रहाणेने 89 कसोटी सामन्यांमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला.
अजिंक्य रहाणे याच्या 5 हजार धावा
5000 Test runs and going strong ??
Keep going, @ajinkyarahane88 #TeamIndia pic.twitter.com/VixAtmYrRK
— BCCI (@BCCI) June 9, 2023
रहाणेन 122 बॉलमध्ये 89 धावांवर नाबाद आहे. रहाणेने या खेळीत 11 चौकार आणि 1 सिक्स ठोकला आहे. तर शार्दुल 83 बॉलमध्ये 4 चौकारांसह 36 धावांवर नाबाद आहे.
दरम्यान लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा झटका लागला. कांगारुंनी टीम इंडियाची ठाकुर-रहाणे ही सेट जोडी फोडली. कॅप्टन पॅट कमिन्स याने आपल्या बॉलिंगवर कॅमरुन ग्रीनच्या हाती रहाणेला कॅच आऊट केला. रहाणे 89 धावा करुन माघारी परतला.
सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी
अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची निर्णायक आणि शतकी भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.