Wtc Final 2023 Day 1 Stumps | पहिला दिवस ट्रेव्हिस हेड -स्टीव्ह स्मिथ जोडीचा, टीम इंडियाचे गोलंदाज फेल
IND vs AUS Day 1 Wtc Final 2023 Highlights | टीम इंडियाचे गोलंदाज पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यात 3 पेक्षा अधिक विकेट घेण्यात अपयश आलं.
लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. कांगारुंनी पहिल्याच दिवशी 300 पार मजल मारली आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाने शानदार सुरुवात केली, मात्र कांगारुंनी दिवसाचा शेवट गोड केला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात मोहम्मद सिराज याने उस्मान ख्वाजा याला झिरोवर आऊट केलं. तर शार्दुल ठाकुर याने डेव्हिड वॉर्नरला 43 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दुसऱ्या सत्रातही लंचनंतर टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. मोहम्मद शमी याने मार्नस लाबुशेन याला 26 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका लागला. त्यामुळे भारतीय क्रिकट चाहत्यांच्या आशा वाढल्या. मात्र स्टीव्हन स्मिथ आणि ट्रेव्हिस हेडने चम्तकार केला.
हेड आणि स्मिथ या दोघांनी 50, 100, 150, 200 आणि पाहता पाहता चौथ्या विकेटसाठी 250 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. या दरम्यान ट्रेव्हिस हेड याने शतक ठोकलं. ट्रेव्हिस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ चांगली साथ देत होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ही जोडी फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र यात काही यश आलं नाही. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 85 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. ट्रेव्हिसने 156 बॉलमध्ये 22 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने नाबाद 146 धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथ शतकाच्या उंबरठ्यावर आहे. स्टीव्हन 227 बॉलमध्ये 14 चौकारांसह 95 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर इतर गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले.
पहिल्या दिवसाचा खेळ
Stumps on Day 1 ?
Indian bowlers were made to toil as Travis Head and Steve Smith put Australia in control ?
Follow the #WTC23 Final ? https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/29K7u7rcPR
— ICC (@ICC) June 7, 2023
दरम्यान आता टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सत्रनिहाय धावा
पहिलं सत्र | 23 ओव्हर 73 धावा आणि 2 विकेट्स
दुसरं सत्र | 28 ओव्हर 97 धावा आणि 1 विकेट
तिसरं सत्र | 34 ओव्हर 157 धावा आणि 0 विकेट
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.