Mohammed Siraj हे वागणं बरं नव्हं! स्टीव्ह स्मिथ याच्या दिशेने बॉल फेकला, नेटकरी संतप्त

mohammed siraj unnecessary aggression against steve smith | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजचा संताप पाहायला मिळाला. नक्की काय झालं?

Mohammed Siraj हे वागणं बरं नव्हं! स्टीव्ह स्मिथ याच्या दिशेने बॉल फेकला, नेटकरी संतप्त
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 4:13 PM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने 327-3 या धावसंख्येपासून खेळाची सुरुवात केली. स्टीव्हन स्मिथ याने नाबाद 95 धावांपासून दुसऱ्या दिवसाचा श्रीगणेशा केला. स्टीव्हनला शतकासाठी अवघ्या 5 धावांची गरज होती. स्टीव्हनने मोहम्मद शमी याच्या बॉलिंगवर दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 2 चौके ठोकत शतक पूर्ण केलं.

स्टीव्हनने सलग 2 चौकार ठोकल्याचा राग सिराज याने जाहीरपणे व्यक्त केला. सिराजने स्टीव्हनच्या दिशेने स्ट्राईक एंडवर बॉल फेकला. सिराजच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

नक्की काय झालं?

सिराजने 86 व्या ओव्हरमधील 3 बॉल पूर्ण केलं. या तिसऱ्याच बॉलवर स्मिथने सलग दुसरा चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. त्यात विकेट्स मिळत नव्हते. सिराजच्या डोक्यात राग होता. सिराज ओव्हरमधील चौथा बॉल टाकायला धावत आला. मात्र स्टीव्ह स्मिथ स्टंपच्या बाजूला झाला. स्पाय कॅमेऱ्यामुळे त्रास झाल्याने स्टीव्ह बाजूला झाला. सिराजला हे काही पटलं नाही. सिराजने न थांबता थेट स्टीव्हच्या दिशेने बॉल फेकला.

मोहम्मद सिराज याचा संताप

सिराजच्या या कृतीबाबत क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “तु आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळतोय, गल्ली क्रिकेट नाही”, “विराट कोहली याच्या संगतीचे परिणाम”, अशा शब्दात नेटकऱ्यांनी सिराजच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. आपण कोणत्या पातळीवर खेळतोय, देशाचं प्रतिनिधित्व करतोय, याचं भान आपल्याला असायला हवं, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशीही मोहम्मद सिराज याने मार्नस लाबुशेन याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहाव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलनंतर सिराजने लाबुशेनजवळ जाऊन काहीतरी बोलून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता.

मार्नस लाबुशेन याला डिवचण्याचा प्रयत्न

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन |

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.