WTC Final 2023 | टीम इंडियासाठी वाईट बातमी, आणखी एक खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात
टीम इंडियाच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे.
धर्मशाळा | टीम इंडिया आयपीएल 16 व्या मोसमानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळणार आहे. या महाअंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे दुखापतग्रस्त झाले आहेत. केएल राहुल याला दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे इशान किशन याला केएलच्या जागी संधी दिली आहे. तर शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट या दोघांनाही दुखापत झालेली आहे. मात्र या दोघांबाबत बीसीसीआयने या दोघांबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.
टीम इंडिया या दुखापतीच्या धक्क्यातून सावरत नाही, तोवर आणखी एक झटका लागला आहे. टीम इंडियाचा स्टारऑलराउंडर दुखापतीच्या कचाट्यात सापडला आहे. आर अश्विन याला दुखापत झाल्याने त्याला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं आहे. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात धर्मशाळा येथे सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून पाठीच्या दुखापतीमुळे अश्विन बाहेर पडला आहे. त्यामुळे अश्विनच्या जागी एडम झॅम्पा याचा समावेश करण्यात आला आहे.
अश्विला झालेली ही दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप फायनलच्या तोंडावर टीम इंडियासाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान अश्विन लवकरात लवकर या दुखापतीतून बरा व्हावा, अशी पार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
आर अश्विन याला दुखापत
TOSS : RR won the toss and elected to bowl first.
Changes :
• R Ashwin injured, Zampa in XI.
Dhawan : "It's gonna be good wicket, whether we bat first or ball."
Changes : • No change in PBKS.
Fantasy team at @drcpfantasy Telegram soon.#PBKSvsRR
— Dr. Cric Point (@drcricpoint) May 19, 2023
पंजाब-राजस्थानसाठी अटीतटीचा सामना
दरम्यान पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांसाठी हा अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा असा सामना आहे. यपीएल 16 व्या मोसमात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी 5 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 5 धावांनी विजय मिळवला होता.
प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे आता या सामन्यात राजस्थान मागील पराभवाचा वचपा घेत प्लेऑफच्या दिशेने पुढचं पाऊल टाकणार की पंजाब किंग्स बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन) प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, एडम झॅम्पा, ट्रेन्ट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल