टीम इंडिया World Record च्या उंबरठ्यावर, Rohit Sharma याच्या नेतृत्वात महारेकॉर्डसाठी सज्ज

टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला खेळणार आहे. टीम इंडियाला नक्की कोणता रेकॉर्ड करण्याची संधी आहे, जाणून घ्या.

टीम इंडिया World Record च्या उंबरठ्यावर, Rohit Sharma याच्या नेतृत्वात महारेकॉर्डसाठी सज्ज
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:24 PM

मुंबई | क्रिकेट टीम इंडियासाठी गेली अनेक वर्ष ही फार धमाकेदार शानदार अशी राहिली. या दरम्यानच्या काळात टीम इंडियाला महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज कर्णधार लाभले. अनेक स्टार खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. मात्र यात एक अशी खंत की टीम इंडियाला 2011 पासून ते आतापर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. हे शल्य टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे.

टीम इंडियाने कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा 1984 साली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात पहिल्याच स्पर्धेत 2007 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर पुन्हा धोनीच्याच नेतृत्वात 28 वर्षांनी 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला. धोनीनेच पुन्हा 23 जून 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली. मात्र ती वर्ल्ड कप स्पर्धा नव्हती.

तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय संघाने अनेक स्पर्धा जिंकल्या. पण 11 वर्षांपासूनची वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची प्रतिक्षा अजूनही कायम आहेत. आता टीम इंडियाला ही 11 वर्षांची प्रतिक्षा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निमित्ताने संपवण्याची सुवर्णसंधी आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 जून ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचं तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हल इथे करण्यात आलं आहे. टीम इंडियाला हा वर्ल्ड कप जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा वर्ल्ड कप जिंकल्यास टीम इंडिया वनडे, टी 20 आणि कसोटी अशा तिन्ही फॉर्मेटमधील वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच टीम ठरेल. आता टीम इंडिया कांगारुं विरुद्ध नक्की कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.