Yashasvi Jaiswal याची टीम इंडियात WTC Final 2023 साठी निवड!
टीम इंडिया जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियात आयपीएलमध्ये चमकलेल्या युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
मुंबई | आयपीएल 16 व्या हंगमानंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागून राहिलं आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी वर्ल्ड कप होणार आहे. या टेस्ट वर्ल्ड कप सरावासाठी आयपीएलमधून बाहेर पडलेल्या टीममधील बरेचसे खेळाडू आधीच इंग्लंडला रवाना झाले आहेत. तर उर्वरित खेळाडू हे रवाना होणार आहे. टीम इंडियाचं 2021 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. टीम इंडियाला तेव्हा अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टीम इंडिया पुन्हा आणि सलग दुसऱ्यांदा महाअंतिम फेरीत पोहचली. हा गदा जिंकण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू जीव ओतून कामगिरी करत आहेत. या दरम्यान मोठी अपडेट आली आहे.
क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 16 वा मोसम गाजवणाऱ्या मुंबईकर यशस्वी जयस्वाल याची टीम इंडियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या युवा मुंबईकर फलंदाजाने आयपीएल 16 व्या पर्वात अफलातून कामगिरी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. यशस्वीला या मेहनतीचं फल अखेर मिळालं आहे. इंडियन्स एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यशस्वीचा ऋतुराज गायकवाड याच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड याचं लग्न ठरलं आहे. ऋतुराज लग्नानंतर टीम इंडियात पुन्हा जोडला जाणार होता. मात्र टीम मॅनेजमेंटने ऋतुराजच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर यशस्वीला संघात ऋतुराजच्या जागी स्थान देण्यात आलं आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. तसेच बीसीसीआयनेही कोणतीही माहिती दिली नाहीये.
“ऋतुराज गायकवाड याने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं. लग्नामुळे मला लंडनला जाता येणार नसल्याचं ऋतुराजने सांगितलं. पण मी टीमसोबत 5 जूनपर्यंत जोडला जाईन, असंही ऋतुराज म्हणाला. मात्र हेड कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली. त्यामुळे आता यशस्वी लवकरच लंडनला रवाना होणार आहे”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.
यशस्वी जयस्वाल याची IPL 2023 मधील कामगिरी
यशस्वीने राजस्थान रॉयल्सकडून 14 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 163.61 च्या कडक स्ट्राईक रेटने 625 धावा केल्या आहेत. यशस्वी ताज्या आकडेवारीनुसार या 16 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान आहे.
यशस्वीचं सोशल मीडियावर कौतुक
Yashasvi Jaiswal included as the stand-by players of Team India for the WTC final. (To Indian Express) pic.twitter.com/1XqV4SHMOf
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 27, 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महामुकाबला केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.
WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.