WTC Final 2023 Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकल्यास भारताला मिळणार इतके कोटी, कसं होतं वाटप वाचा

World Test Championship 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. आता विजयी संघासोबत बक्षिसाची रक्कम किती असेल, याची घोषणा करण्यात आली आहे.

WTC Final 2023 Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकल्यास भारताला मिळणार इतके कोटी, कसं होतं वाटप वाचा
WTC Final 2023 Ind vs Aus : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकल्यावर टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, बक्षिसाची रक्कम कशी ठरते वाचा
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 3:57 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम फेरीचा सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात हा सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला किती कोटी रुपये मिळतील याबाबतची घोषणा आयसीसीने केली आहे. नऊ संघांमध्ये 31 कोटी रुपये वाटले जाणार आहे. 2021-23 दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खेळलेल्या संघांचा यात सहभाग असणार आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 दरम्यान असलेली बक्षिसाची रक्कम कायम ठेवली आहे. यात कोणताही बदल केलेला नाही. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती रुपये मिळतील ते..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या संघाला 13 कोटींची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर संघांनाही पैसे मिळणार आहेत. उपविजेत्या संघाला साडे सहा कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाला 3 कोटी 70 लाख, चौथ्या क्रमांकावरील इंग्लंड संघाला 2.89 कोटी, पाचव्या क्रमांकावरील श्रीलंकन संघाला 1.65 कोटी रुपये मिळतील.

सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाला, सातव्या क्रमांकावरील पाकिस्तान संघाला, आठव्या क्रमांकावरील वेस्ट इंडिज संघाला आणि नवव्या क्रमांकावरील बांगलादेश संघाला प्रत्ये 82 लाख रुपये मिळणार आहेत.

दोन वर्ष कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत करत आपलं स्थान अंतिम फेरीत निश्चित केलं आहे. अंतिम फेरीचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. हा सामना 7 जून 2023 ते 11 जून 2023 दरम्यान असेल. तसेच एक दिवस राखून ठेवला आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भारत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

भारताचे स्टँडबाय प्लेयर्स : ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.