WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्लेइंग 11 मध्ये केएल राहुलला घेणार? गणित समजून घ्या
WTC 2023 IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून असणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? याबाबत खलबतं सुरु आहेत.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडणार आहेत. आयपीएल 2023 स्पर्धा सुरु असताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोणते 11 खेळाडू असतील याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. इंग्लंडची स्थिती, तिथलं वातावरण आणि अनुभव या जोरावर खेळाडूंची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली जाऊ शकते. मग प्लेइंगल इलेव्हनमध्ये केएल राहुल असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, काही क्रीडाप्रेमींच्या मते केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे.
केएल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार?
बीसीसीआयने घोषणा केलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत केएल राहुल याचं नाव आहे. त्यात विकेटकीपर म्हणून केएस भारत याच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. पण फलंदाजी आणि अनुभवाच्या जोरावर केएल राहुल हा केएस भारतपेक्षा उजवा ठरू शकतो. कारण केएल राहुल विकेटकीपिंगही करतो. त्यामुळे अंतिम 11 मध्ये रोहित केएल राहुलचा विचार करेल.
सलामीला कोण उतरणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलामीला कोण उतरणार? असाही प्रश्न निर्माण होतो. कारण सलामीसाठी दोन फलंदाज या संघात आहेत. रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिल की केएल राहुल उतरणार हा देखील प्रश्न आहे.
शुभमन गिलने कसोटी मालिकेत 44.42 च्या सरासरीने 311 धावा, तर केएल राहुलने 13.37 च्या सरासरीने 95 धावा केल्या आहेत. त्यामुळे सलामीला रोहित शर्मासोबत शुभमन गिल उतरण्चयाची दाट शक्यता आहे.
मधल्या फळीची जबाबदारी या खेळाडूंवर
मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असेल. अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये चांगला सूर गवसला आहे. त्यामुळे त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे.
आयपीएल 2023 मध्ये रहाणेनं 11 डावात 634 धावा केल्या आहेत. रहाणेचा बॅटिंग सरासरी 50 पेक्षा अधिक धावांची आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेची वर्णी लागेल.सहाव्या स्थानावर केएल राहुल उतरेल.
अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाज
भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे दोघंही अष्टपैलू खेळाडू आहेत. फिरकीसोबत दोघंही फलंदाजीतही चांगले आहेत. त्यामुळे त्यांना संघात सातव्या आणि आठव्या स्थानावर यांना संधी मिळेल.
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. उमेश यादव ऐवजी शार्दुलचा विचार केला जाईल. कारण इंग्लंडच्या मैदानात लॉर्ड शार्दुलची कामगिरी चांगली राहिली आहे.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत/केएल राहुल, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.